सौ. प्रमिला तळवडेकर यांचे निधन
ओटवणे प्रतिनिधी
सरमळे येथील रहिवासी सौ प्रमिला सुरेश तळवडेकर (६५) यांचे शुक्रवारी सायंकाळी गोवा बांबोळी रुग्णालयात निधन झाले. गेले दोन आठवडे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव रात्री गावी आणल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत तळवडेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सावंतवाडी एसटी आगाराचे निवृत्त चालक सुरेश तळवडेकर यांच्या त्या पत्नी, सरमळे माजी सरपंच तथा हॉटेल समाधानचे मालक सुधीर तळवडेकर, श्रीपाद तळवडेकर, दिगंबर तळवडेकर यांच्या त्या मातोश्री तसेच पांडुरंग तळवडेकर आणि अरुण तळवडेकर यांच्या त्या भावजय तर युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय तळवडेकर यांच्या त्या काकी होत. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, दिर, जाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.