महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राफेल, मिराज विमानांकरता भारतात एमआरओ स्थापन करणार

06:30 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डसॉल्ट एव्हिएशनने घेतला निर्णय : नोएडा शहरात उपलब्ध होणार सुविधा

Advertisement

वृत्तसंस्था/ नोएडा

Advertisement

फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशन भारतीय वायुदलात असलेल्या फ्रेंच लढाऊ विमानांना सहाय्य देण्यासाठी उत्तरप्रदेशच्या नोएडा शहरात एक नवी देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ) सुविधा स्थापन करणार आहे. भारतीय वायुदल 1980 च्या दशकात सामील करण्यात आलेल्या जवळपास 50 मिराज-2000 विमानांचे अणि मागील काही वर्षांमध्ये ताफ्यात सामील 36 राफेल लढाऊ विमानांचे संचालन करते.

फ्रान्सच्या कंपनीने अलिकडेच संरक्षण मंत्रालय आणि भारतीय वायुदलाला यासंबंधी कळविले आहे. डसॉल्ट एव्हिएशन स्वत:कडून निर्मित लढाऊ विमानांची देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल साहाय्य प्रदान करण्यासाठी एक नवी भारतीय कंपनी डसॉल्ट एव्हिएशन मेंटेनेन्स रिपेर अँड ओव्हरहॉल इंडिया स्थापन करणार आहे. भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीकोनाच्या अनुरुप नवी एमआरओ कंपनी स्थापन केली जाणार आहे. उत्तरप्रदेशच्या नोएडा येथील औद्योगिक क्षेत्रांमध्ये हे सुविधा केंद्र असेल असे कंपनीने संरक्षण मंत्रालयाला कळविले आहे.

पोसिना वेंकट राव असणार सीईओ

नव्या भारतीय कंपनीत भारतीय नागरिक आणि डसॉल्टचे भारतातील प्रतिनिधी राहिलेले पोसिना वेंकट राव हे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. राव अनेक दशकांपासून भारतात डसॉल्ट एव्हिएशनशी निगडित राहिले आहेत. कंपनीच्या भारतातील कार्यात त्यांचा सहभाग  राहिला आहे. त्यांच्या टीममध्ये फ्रेंच तसेच भारतीय नागरिकांचा समावेश असेल.

राफेल मरीन जेटसाठी प्रयत्नशील

डसॉल्ट स्वत:च्या राफेल मरीन जेटच्या विक्रीसाठी भारतीय नौदलासोबत चर्चा करत आहे. भारतीय नौदल 26 राफेल मरीन जेट खरेदी करण्याच्या विचारात आहे. ही लढाऊ विमाने आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेवर तैनात केली जाणार आहेत. भारतीय वायुदलाने अंबाला आणि हाशिमारा येथे राफेल लढाऊ विमानांसाठी दोन तळ तयार केले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article