‘स्पिरिट’मध्ये मृणार ठाकूर नायिका
प्रभाससोबत मोठ्या पडद्यावर करणार रोमान्स
संदीप रेड्डी वांगाने कबीर सिंह आणि अॅनिमल या हिट चित्रपटांसोबत बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आता तो प्रभासची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘स्पिरिट’ घेऊन येणार आहे. चित्रपटात प्रभास पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. याचदरम्यान या चित्रपटातील नायिकेचे नाव समोर आले आहे.
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि निर्माते भूषण कुमार नायिकेच्या भूमिकेसाठी मृणाल ठाकूरसोबत चर्चा करत आहेत. स्पिरिट हा चित्रपट बिगबजेटचा असणार आहे. यात सैफ अली खान आणि करिना कपूरही दिसून येणार आहे. चित्रपटात दोघेही खलनायकाच्या भूमिकेत असतील. या चित्रपटाला हर्षवर्धन रामेश्वर यांचे संगीत लाभणार आहे. त्यांनीच अॅनिमल या चित्रपटाला संगीत दिले होते. या चित्रपटाची निर्मिती भद्रकाली पिक्चर्स आणि टी-सीरिजकडून संयुक्तपणे केली जात आहे. हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.