For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फॅमिली स्टार’मध्ये मृणाल

06:42 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
फॅमिली स्टार’मध्ये मृणाल
Advertisement

वेगळ्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री

Advertisement

मृणाल ठाकूरने अत्यंत कमी कालावधीत स्वत:च्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविले आहे. दक्षिण भारतातही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. अलिकडेच ती अभिनेता नानीसोबत ‘हाय पापा’ या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला मोठी पसंती मिळाली होती.

मृणाल आता आगामी काळात विजय देवरकेंडासोबत ‘फॅमिली स्टार’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा अत्यंत मजेशीर आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना मनोरंजनाच्या सर्व गोष्टी पहायला मिळतील. चित्रपटात नृत्य, सुंदर गाणी, सुंदर दृश्यं आहेत. या चित्रपटातून लोकांना मी आश्चर्यचकित करू इच्छिते असे मृणालने म्हटले आहे.

Advertisement

परशुराम यांच्या दिग्दर्शनाची शैली अत्यंत कौतुकास्पद आहे. तसेच त्यांच्या लेखनाची मी चाहती आहे. माझ्यासाठी त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा तसेच रोहिणी मुख्य भूमिका साकारत असल्याची माहिती मृणालने दिली आहे.

Advertisement
Tags :

.