For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वडगाव, अनगोळ भागात मृणाल हेब्बाळकरांचा प्रचार

10:00 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
वडगाव  अनगोळ भागात मृणाल हेब्बाळकरांचा प्रचार
Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी गुरुवारी सायंकाळी प्रचार करत मतयाचना केली. यावेळी त्यांना अनेकांनी पाठिंबा देऊन विजयी करण्याचे आश्वासन दिले. काँग्रेस सरकारने जारी केलेल्या अन्नभाग्य, गृहलक्ष्मी, गृहज्योती, शक्ती योजनांमुळे कुटुंबाला अनुकूल झाले आहे. विणकरांना काँग्रेसने जितकी मदत केली तितकी कोणीही केलेली नाही. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आश्वासन वडगाव आणि अनगोळ भागातील नागरिकांनी दिले. मतदारसंघाच्या विकासाची अनेक स्वप्ने घेऊन लोकसभेची निवडणूक लढवत आहे. जनतेने निवडून दिल्यास त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काम करेन, अशी ग्वाही मृणाल हेब्बाळकर यांनी दिली. याप्रसंगी स्थानिक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. मृणाल यांनी विणकर नेते पी. डी. धोत्रे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

Advertisement

Advertisement
Tags :

.