For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

दाक्षिणात्य दिग्दर्शकांची पसंत ठरली मृणाल

06:01 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
दाक्षिणात्य दिग्दर्शकांची पसंत ठरली मृणाल

अनेक चित्रपटांमध्ये दिसून येणार

Advertisement

मृणाल ठाकूर ही आघाडीची अभिनेत्री आहे. मागील काही काळापासून ती अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. स्वत:चा अभिनय आणि दमदार भूमिकेमुळे तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. टीव्हीच्या जगतात काम केल्यावर मोठ्या पडद्यावर दिसून आलेल्या मृणालने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मृणाल आता दक्षिणेतील पसंतीची अभिनेत्री होण्याचा मान मिळविला आहे. मृणालने तमिळ चित्रपटसृष्टीच्या दोन दिग्गज दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये काम करण्यास होकार दर्शविला आहे.

मृणाल अलिकडेच ‘हाय नन्ना’ या तेलगू चित्रपटात दिसून आली होती. यातील तिच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले होते. मृणाल आता एआर मुरगादॉस यांच्याकडून दिग्दर्शित चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात ती शिवकार्तिकेयनसोबत झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘एसके 23’ असणार आहे.

Advertisement

याचबरोबर सिम्बु उर्फ एसटीआर यांच्या 48 व्या चित्रपटात मृणाल मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन देशसिंह पेरियासामी करणार आहेत. तर कमल हासन या चित्रपटाचे निर्माते असणार आहे. मृणाल सध्या विजय देवरकोंडासोबत ‘फॅमिली स्टार’ या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. हा चित्रपट 5 एप्रिल रोजी तेलगु, तमिळ आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर मृणाल ही ‘पूजा मेरी जान’मध्ये दिसून येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.