‘एमआरएफ’चा नफा 119 टक्क्यांनी वाढला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिग्गज टायर क्षेत्रातील प्रमुख कंपनी एमआरएफने शुक्रवारी चालू आर्थिक वर्ष 2025-26 च्या तिसऱ्या तिमाहीत प्रभावी निकाल नोंदवले. टायर कंपनी एमआरएफ या कंपनीचा तिमाही नफा 119 टक्क्यांनी वाढला आहे. या वाढीसह तिमाहीत 692 कोटी रुपयांवर पोहोचल्याची नोंद आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत एमआरएफचा नफा 315.46 कोटी रुपये होता. कंपनीच्या तिमाही आधारावरही नफ्यात मोठी वाढ दिसून आली आहे. दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत नफा 31.6 टक्क्यांनी वाढला आहे.
कंपनीने मागील तिमाहीत 525.64 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. कंपनीच्या नफ्यात या तीव्र वाढीचे मुख्य कारण म्हणजे निव्वळ नफ्याच्या मार्जिनमध्ये झालेली सुधारणा सांगितली जात आहे. एमआरएफच्या कामकाजातून मिळणाऱ्या उत्पन्नातही चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे. तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 15 टक्क्यांनी वाढून 8,050.43 कोटी रुपये झाला आहे, जो तिमाही आर्थिक वर्ष 25 च्या तिसऱ्या तिमाहीत 7,000.82 कोटी रुपये होता. त्याच वेळी, मागील तिमाहीच्या तुलनेत महसूल 9.1 टक्क्यांनी वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 7,378.72 कोटी रुपये होता. एमआरएफने त्यांच्या भागधारकांना प्रति शेअर 3 चा दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.