महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘एमआरएफ’चा निव्वळ नफा घसरणीत

06:18 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

7.6 टक्क्यांच्या घसरणीची नेंद :194  रुपयाचा लाभांश घोषित

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशातील सर्वात मोठी टायर कंपनी असलेल्या मद्रास रबर फॅक्टरी (एमआरएफ) ने शुक्रवार, 3 मे रोजी आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीचा स्वतंत्र निव्वळ नफा 7.6 टक्क्यांनी घसरून 379.6 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत तो 410.7 कोटी रुपये होता. ऑपरेशन्समधील महसूल 8.6 टक्क्यांनी वाढला आहे

टायर निर्मात्याचा ऑपरेशन्समधील महसूल वार्षिक 8.6 टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष 24 मध्ये 6,215.1 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत तो 5,725.4 कोटी रुपये होता.

कंपनीचा ऑपरेटिंग नफा तिमाहीत 5 टक्क्यांनी वाढून 885.7 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत तो 843.1 कोटी रुपये होता.

भागधारकांना 200 रुपये लाभांश 

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत, एमआरएफने सांगितले की, त्यांच्या बोर्डाने प्रति शेअर 10 रुपये दर्शनी मूल्यावर 194 रुपये लाभांश जाहीर केला आहे.

एक्सचेंज फाइलिंगमध्ये, कंपनीने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 3 रुपये दोन लाभांश आधीच दिले आहेत. अशा प्रकारे आर्थिक वर्ष 2024

साठी एकूण लाभांश 200 रुपये होईल.

एकत्रित नफ्यात 16 टक्क्यांनी वाढ

आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 16 टक्क्यांनी वाढून 396.11 कोटी रुपये झाला आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article