इजाज लास्कर मि.युवा दसरा किताबाचा मानकरी
गिरीश मॅगेरी उपविजेता, लोकेश भोसले उत्कृष्ट पोझर : शिमोगा येथे दसरा युवा शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन, 150 स्पर्धकांचा समावेश
बेळगाव : शिमोगा येथे कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व शिमोगा जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय युवा दसरा शरीरसौष्ठव स्पर्धेत बेंगळूरच्या इजाज अहम्मद लास्कर आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. युवा दसरा किताबाचा मानकरी ठरला. तर धारवाडचा गिरीश मॅगेरी याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. धारवाडचा लोकेश भोसलेने उत्कृष्ट पोझरचा बहुमान मिळविला. आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार 8 वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. जवळपास संपूर्ण राज्यातून 150 स्पर्धकांनी भाग घेतला होता. निकाल पुढीलप्रमाणे...
55 किलो वजनी गटात
1) कृष्णा प्रसाद-उडपी, 2) सलमान खान-शिमोगा, 3) अस्लम शेख-धारवाड, 4) आकाश निंगराणी-बेळगाव, 5) महम्मद रफीक-धारवाड
60 किलो वजनी गटात
1) शशिधर नाईक-उडपी, 2) नागराज-चिक्कमंगळूर, 3) नितेश गोरल-बेळगाव, 4) विजय नागेश निलाजी-बेळगाव, 5) कुमार-शिमोगा
65 किलो वजनी गटात
1) नवीन नयन-कारवार 2) मणिराजू एम.-कोलार, 3) सोमशेखर-उडुपी, 4) हर्षा पी.-बेंगळूर, 5) सुनिल-म्हैसूर
70 किलो वजनी गटात
1) मंजुनाथ कोल्हापुरे-बेळगाव, 2) रघुनंदन बी.-बेंगळूर, 3) अझर पाशा-शिमोगा, 4) मणिकांत-दावणगेरी, 5) प्रतिक दत्तात्रय पाटील-बेळगाव
75 किलो वजनी गटात
1) दिनेश आचार्य-कारवार, 2) राहुल एम. एम.-दावणगेरी, 3) प्रताप कालकुंद्रीकर-बेळगाव, 4) शोहेब पाशा-बेंगळूर, 5) संपतकुमार-शिमोगा
80 किलो वजनी गटात
1) गिरीश मॅगेरी-धारवाड, 2) युसुफ आय. बी.-दावणगिरी, 3) क्लिंटन-कारवार, 4) राहुल कलाल-बेळगाव, 5) भिष्मा बी.-दावणगिरी
85 किलो वजनी गटात
1) राहुल एम.-दावणगिरी, 2) अखिलेश के.-कारवार, 3) सत्यानंद भट्ट-म्हैसूर, 4) प्रसाद जी.जे.-बेंगळूर, 5) सुजित शिंदे-बेळगाव
85 किलो वरील वजनी गटात
1) इजाज अहम्मद लास्कर-बेंगळूर, 2) विकास सुर्यवंशी-बेळगाव, 3) महम्मद नुरुल्ला-चित्रदुर्ग, 4) गितेश-कारवार, 5) सुप्रिम-कारवार यांनी विजेतेपद पटकाविले.
त्यानंतर मिस्टर दसरा युवा किताबासाठी कृष्णाप्रसाद, शशिधर नाईक, नवीन एन., मंजुनाथ कोल्हापुरे, इजाज अहम्मद लास्कर, राहुल एम., गिरीश मॅगेरी, दिनेश आचार्य यांच्यात लढत झाली. इजाज अहम्मद लास्कर व गिरीश मॅगेरी यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये इजाज अहम्मद लास्करने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. युवा दसरा हा मानाचा किताब पटकाविला. तर गिरीश मॅगेरी याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. उकृष्ट पोझरच्या स्पर्धेत धारवाडच्या लोकेश भोसलेने बाजी मारत विजेतेपद पटकाविले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, मानाचा किताब, चषक, प्रमाणपत्र व भेटवस्तु देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून गंगाधर एम., सुनिल राऊत, जे. निलकंठ, जे. डी. भट्टसह अनेक पंचांनी काम पाहिले.