For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

MPCS ने 'प्रतिभा सेतू'सारखा उपक्रम हाती घेणे का आवश्यक आहे?

04:39 PM Jul 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
mpcs ने  प्रतिभा सेतू सारखा उपक्रम हाती घेणे का आवश्यक आहे
Advertisement

एमपीएससी कडून 'टॅलेंट बँक' उभी करण्यात आली, तर....

Advertisement

कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) सुरू केलेल्या 'प्रतिभा सेतू' या नव्या उपक्रमामुळे अंतिम गुणवत्ता यादीत न आलेल्या, परंतु परीक्षेचे सर्व टप्पे पार केलेल्या उमेदवारांनाही सरकारी आणि खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमामुळे युपीएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विनियोग योग्य ठिकाणी होणार आहे.

अशाच पद्धतीचा उपक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) देखील सुरू करावा, अशी मागणी राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे. दरवर्षी एमपीएससी मार्फत गट अ, गट ब आणि गट क मधील विविध परीक्षांसाठी लाखो विद्यार्थी अर्ज करतात.

Advertisement

त्यापैकी अनेक विद्यार्थी लेखी परीक्षा किंवा मुलाखत यशस्वीरित्या पार करूनही अंतिम निवड यादीत स्थान मिळवू शकत नाहीत. मात्र या विद्यार्थ्यांची मेहनत, गुणवत्ता आणि कौशल्य वाया जात आहे. हीच गुणवत्ता राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये, सार्वजनिक उपक्रमांमध्ये आणि खाजगी क्षेत्रामध्ये उपयोगात आणली जाऊ शकते.

त्यामुळे 'प्रतिभा सेतू'सारख्या उपक्रमाची महाराष्ट्रातही गरज निर्माण झाली आहे. यूपीएससी चा 'प्रतिभा सेतू' काय आहे ? पूर्वी 'पब्लिक डिस्क्लोजर स्कीम' (पीडीएस) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे आता 'प्रतिभा सेतू' असे नामकरण करण्यात आले आहे.

यामध्ये लेखी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केलेले पण अंतिम गुणवत्ता यादीत न आलेले उमेदवार सामील असतात. त्यांचा बायोडेटा, शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि संपर्क माहिती 'प्रतिभा सेतू' पोर्टलवर अपलोड केली जाते. नोकरी देऊ इच्छिणाऱ्या सरकारी किंवा खाजगी संस्था याच पोर्टलवर लॉगिन करून योग्य उमेदवारांची निवड करू शकतात.

हा प्लॅटफॉर्म एका 'डेटा बँक'प्रमाणे काम करतो. आतापर्यंत या पोर्टलवर युपीएससी परीक्षेतून बाहेर पडलेल्या १०,००० हून अधिक गुणवंत उमेदवारांचा डेटा संकलित केला आहे. भारतीय वनसेवा, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, आर्थिक व सांख्यिकी सेवा, वैद्यकीय सेवा अशा परीक्षातील पात्र पण अंतिम यादीत नसलेल्या उमेदवारांची नावे येथे समाविष्ट आहेत.

'एमपीएसी'साठी अशी संधी का नाही ?

राज्यसेवा परीक्षा, सहाय्यक परीक्षा, पोलीस उपनिरीक्षक, गट ब, गट क अशा विविध परीक्षांमधून दरवर्षी हजारो विद्यार्थी बाहेर पडतात. त्यांचा अभ्यासकाळ तीन ते पाच वर्षांचा असतो. त्यांनी मिळवलेले ज्ञान, अनुभव व मेहनत याचा योग्य विनियोग न झाल्यास समाजाची आणि राज्याचीही हानी होते. त्याउलट, जर एमपीएससी कडून 'टॅलेंट बँक' उभी करण्यात आली, तर त्या माध्यमातून कंपन्यांना, शासकीय प्रकल्पांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि उद्योजकांना प्रशिक्षित मनुष्यबळ सहज मिळू शकते.

यूपीएससी प्रमाणेच एमपीएससीने देखील 'प्रतिभा सेतू'सारखा उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. अशा पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील हजारो गुणवंत तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी मिळण्याचा मार्ग खुले होतील. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी जसा अभ्यास आवश्यक आहे, तशीच संधी देण्यासाठी शासनाची जबाबदारीदेखील तितकीच महत्त्वाची आहे.

राज्य शासनाची भूमिका महत्त्वाची

कौशल्य विकास, उद्योग आणि उच्च शिक्षण विभागाने यामध्ये पुढाकार घ्यायला हवा. एक सुसज्ज पोर्टल तयार करून, परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यानंतर अपात्र ठरलेल्या पण पात्र उमेदवारांची माहिती गोळा केली जाऊ शकते. एमपीएसी मार्फत ‘राज्य प्रतिभा सेतू‘ उपक्रम सुरू केला जाऊ शकतो. यामुळे निवड प्रक्रिया पारदर्शक राहील आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीला व्यावसायिक मूल्य मिळेल.

विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवण्यासाठी पाउढले उचलणे गरजेचे

यूपीएससीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एमपीएससीनेही असा उपक्रम हाती घ्यावा. गुणवंत विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक आहे. आम्ही गेली कित्येक वर्ष ही मागणी करतोय महाराष्ट्र शासनाने याचा विचार करावा जेणेकरून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.

- जॉर्ज व्रूझ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि व्याख्याते

टॅलेंट वापरण्याची संधी मिळावी

लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी मिळाली नाही तरी आमच्याकडे ज्ञान, तयारी आणि कौशल्य आहे. ते वापरण्यासाठी एक संधी मिळावी. सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा. एमपीएससीतील टॅलेंट इतरत्र वाया जाउढ नये यासाठी युपीएससीने अंवलंबलेला मार्ग एमपीएससीने अवलंबावा

- सतीश बरगे, स्पर्धा परीक्षा अभ्यासक

Advertisement
Tags :

.