राज्य सेवा मुख्य परीक्षेसह तीन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या
09:16 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) ३ ऑक्टोबर २०२६ पासून होणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२६, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा-२०२६ आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा-२०२६ या तीन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
Advertisement
या परीक्षांच्या सुधारित तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत. राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२५ च्या मूल्यांकनाबाबत अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी आक्षेप नोंदविले आहेत. आयोगाने या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतला आहे.
Advertisement
Advertisement