For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुण्यात MPSC विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; पेपरफुटीच्या चर्चेवरून विद्यार्थ्यांमध्ये संताप, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी

04:05 PM Sep 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुण्यात mpsc विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ  पेपरफुटीच्या चर्चेवरून विद्यार्थ्यांमध्ये संताप  mpsc अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी
Advertisement

पुणे / प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. प्रथमेश हा धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

प्रथमेशवर सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक संशय असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दरम्यान, MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखावी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Advertisement

या घटनेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दिपके यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. MPSCच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर वाढता आर्थिक आणि मानसिक ताण, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता तसेच कथित पेपरफुटीच्या प्रकरणांवरून आता सरकारसमोर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रथमेशच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यांवर ठोस कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Advertisement
Tags :

.