For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासदारांकडून जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा

12:18 PM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
खासदारांकडून जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा
Advertisement

बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी बेळगाव जिह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी केंद्र सरकारच्या रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण व विमानतळ प्रशासनाकडून सुरू असलेल्या विकासकामांची माहिती घेण्यात आली. बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वे मार्गाच्या 11,190 एकर जमिनीच्या विकासाबाबद प्रश्न विचारला असता 407 एकर जमीन यापूर्वीच संपादित केली असून उर्वरित संपादन राज्य सरकारच्या निधीअभावी रखडल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

टिळकवाडी येथील रेल्वेगेटच्या कामाला लवकरच सुरुवात करण्याची सूचना करण्यात आली. बेळगाव विमानतळाच्या विकासासंदर्भात समांतर टॅक्सी टॅक बांधकांमासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी अधिकाऱ्यांनी केली. बेळगाव-हुनगुंद-रायचूर या रस्त्याच्या भूसंपादनाला गती मिळाली आहे. 37 कि. मी. रस्त्याचे भूसंपादन पूर्ण झाले असून 270 कोटी भरपाई वितरित केल्याची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह राजर्षी जैनापुरे, बलराज चव्हाण, भुवनेश कुमार, पवण गुरुवे, विमानतळ संचालक त्यागराजन, रेल्वे अभियंता विनायक यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.