जिल्ह्यातील विकासकामांचा खासदारांकडून आढावा
रेल्वे, महामार्ग, विमानतळाबद्दल घेतली माहिती : जमीन संपादनासाठी 149 कोटीचा प्रस्ताव
प्रतिनिधी/ बेळगाव
खासदार जगदीश शेट्टर यांनी शनिवारी बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती जाणून घेण्यासाठी बैठक बोलाविली होती. या बैठकीमध्ये रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग व विमानतळ या संबंधित विकासकामांचा आढावा घेण्यात आला. टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उ•ाण पुलाच्या दुसऱ्या भागाचे काम लवकरच सुरू केले जाणार असून, वाहतूक मार्ग बदलण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून परवानगी मागण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या नवीन रेल्वेमार्गाच्या प्रगतीबाबत खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, सुमारे 1200 एकर जमीन संपादित करण्यासाठी 149 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आधीच पाठविण्यात आला आहे. अंतिम सूचना जारी करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यास जमीन रेल्वे विभागाकडे सोपविणे व निविदा मागविणे सोयीचे होईल
अडथळे लवकरच दूर करणार
टिळकवाडी येथील पहिले व दुसरे रेल्वेगेट येथील उ•ाण पुलाच्या कामामध्ये काही अडथळे असून ते लवकर दूर केले जातील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुळेभावी गावानजीक रेल्वे विभागाने बांधलेल्या उ•ाण पुलामुळे शेतकऱ्यांना शेता रेल्वेगेट येथील उ•ाण पुलाच्या कामामध्ये काही अडथळे असून ते लवकर दूर त जाण्यासाठी व पिकांची वाहतूक करण्यासाठी गैरसोय होत आहे. ती दूर करण्यासाठी रेल्वे विभागाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशा सूचना खासदारांनी दिल्या. रेल्वे विभागाकडून खानापूरजवळ ओव्हर ब्रीज बांधण्यात येत होता.
परंतु बेळगाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे काम सुरू होण्यास अडथळे येत आहेत. बेळगावच्या उपवनसंरक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने मंजुरी द्यावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
बेळगाव-संकेश्वर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरी ओव्हर ब्रीज बांधणारी कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत असून, तातडीने काम पूर्ण करावे. हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या अंतिम तारखेला एक वर्ष उलटले आहे. त्यामुळे ते देखील वेळेत पूर्ण करावे. बेळगाव-हुनगुंद-रायचूर रस्त्याच्या बांधकामाबाबत 35 किलोमीटरचे भूसंपादन पूर्ण झाले असून उर्वरीत संपादन लवकर करावे, असे सांगण्यात आले.
हवाई दल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
बेळगाव विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक असलेली जमीन हवाई दलाने उपलब्ध करून द्यावी. हवाई दलाचे अधिकारी प्रतिसाद देत नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर आपण याबाबत संरक्षण मंत्र्यालयासोबत चर्चा करू, असे खासदारांनी सांगितले. यावेळी भूसंपादन अधिकारी राजश्री जैनापुरे, राष्ट्रीय महामार्गाचे बलराम चव्हाण, कविता योगप्पण्णावर, भुवनेशकुमार, बेळगाव विमानतळ संचालक एस. त्यागराजनसह इतर उपस्थित होते.