For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासदारकन्येच्या कारने युवकाला चिरडले

06:53 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
खासदारकन्येच्या कारने युवकाला चिरडले
Advertisement

पुण्यासारखी चेन्नईत घटना : मद्यधुंद स्थितीत चालवत होती कार : पोलीस स्थानकातच मिळाला जामीन

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

पुण्यातील पोर्श कार दुर्घटना प्रकरणानंतर चेन्नईत हिट-अँड-रनचे आणखी एक हायप्रोफाइल प्रकरण समोर आले आहे. चेन्नईत राज्यसभा खासदाराच्या कन्येने फुटपाथवर झोपत असलेल्या इसमावर स्वत:ची बीएमडब्ल्यू कार चढविली. या दुर्घटनेत या इसमाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे दुर्घटनेनंतर खासदाराच्या कन्येला पोलीस स्थानकातच जामीन मिळाला आहे. आरोपीला त्वरित जामीन मिळाल्याने आता सर्वच स्तरांतून विरोधाचे सूर उमटू लागले आहेत.

Advertisement

वायएसआर काँग्रेसचे राज्यसभा खासदार बीडा मस्तान राव यांची कन्या माधुरी  ही याप्रकरणी आरोपी आहे. मृत इसमाचे नाव सूर्या असून तो 24 वर्षांचा होता आणि पेंटिंगचे काम करायचा, आठ महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. कारचालक युवती हे धनाढ्याची कन्या असल्याने तिच्या विरोधात चेन्नई पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

माधुरी ही मद्यधुंद अवस्थेत कार चालवित होती. तिची एक मैत्रिण देखील दुर्घटनेवेळी कारमध्ये होती. चेन्नईच्या बेसेंट नगरमध्ये माधुरीने फुटपाथवर झोपलेल्या युवकावरच कार चढविली. दुर्घटनेनंतर माधुरीने तेथून पळ काढला, तर तिची मैत्रिण दुर्घटनेनंतर जमा झालेल्या लोकांसोबत वाद घालत होती. काही वेळानंतर तिनेही तेथून पोबारा केला.

गर्दीतील काही लोकांनी जखमी युवकाला रुग्णालयात हलविले, परंतु त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असताना संबंधित कार बीएमआर (बीडा मस्तान राव) ग्रूपची असून पु•gचेरीत नोंदणीकृत असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी माधुरीला अटक केली, परंतु पोलीस स्थानकातच तिला जामीन मिळाला. मृताचे नातेवाईक आणि अन्य लोकांनी पोलीस स्थानकाच्या परिसरात एकत्र येत आरोपीच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

कोण आहेत खासदार बीडा मस्तान राव?

बीडा मस्तान राव हे आंध्रप्रदेशातील राजकीय नेते असून मोठे उद्योजक आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार ते 165 कोटी रुपयांहून अधिक संपत्तीचे मालक आहेत. बीडा मस्तान यांची कंपनी बीएमआर समूह सी-फूड क्षेत्रातील एक दिग्गज नाव आहे.  बीडा मस्तान राव हे 2009-2019 पर्यंत तेलगू देसम पक्षात होते. यादरम्यान 2009-14 पर्यंत ते आंध्रप्रदेशच्या कवाली मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी 2019 मध्ये वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2022 मध्ये वायएसआर काँग्रेसने त्यांना राज्यसभा सदस्यत्वाची संधी दिली होती.

Advertisement
Tags :

.