For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या खासदाराचे निधन

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या खासदाराचे निधन
Advertisement

वृत्तसंस्था /चेन्नई

Advertisement

तामिळनाडूतील एमडीएमकेचे खासदार गणेशमूर्ती यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजता कोईम्बतूरच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. चार दिवसांपूर्वीच गणेशमूर्ती यांनी किटकनाशक प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गणेशमूर्ती यांच्या पार्थिवावर गुरुवारी अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने ते नैराश्यात होते, यातूनच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. किटकनाशक प्राशनानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती.  विषप्राशनाची बाब कुटुंबीयांना सांगताच त्यांना इरोड शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी त्यांना कोईम्बतूर येथील एका खासगी रुग्णालयात हलविले होते. गणेशमूर्ती यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना ईसीएमओ सिस्टीमवर ठेवले होते, परंतु त्यांचे शरीर या उपचारावर प्रतिसाद देत नव्हते. गणेशमूर्ती हे रुग्णालयात शुद्धीत नसल्याने अशाप्रकारचे टोकाचे पाऊल का उचलले हे कळू शकले नसल्याचा दावा एमडीएमके प्रमुख वायको यांनी केला आहे. गणेशमूर्ती हे पूर्वी द्रमुकमध्ये कार्यरत होते. 1989 मध्ये त्यांनी द्रमुकचे उमेदवार म्हणून मोडाकुरिची विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला होता. 1996 मध्ये वायको यांन एमडीएमके पक्षाची स्थापना केल्यावर ते नव्या पक्षात सामील झाले होते. 1998 आणि 2009 मध्ये ते एमडीएमकेच्या तिकिटावर इरोड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. 2019 मध्येही त्यांनी एमडीएमकेच्या तिकिटावर विजय मिळविला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.