जिह्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशिल : नवनिवार्चित खासदार श्रीमंत शाहू छत्रपती; कोल्हापुरातील ‘तरूण भारत संवाद’ कार्यालयास सदिच्छा भेट
सर्वांच्या सहकार्याने विकास कामाचा प्लॅन तयार करणार; 15 ऑगष्टपर्यंत पाच तालुक्यात संपर्क कार्यालय सुरू करणार
कोल्हापूर प्रतिनिधी
सर्वांच्या सहकार्याने जिह्याच्या सर्वांगिण विकास करण्यासाठी प्रयत्नशिल आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे नवनिवार्चित खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी केले. विकास कामासाठी लवकरच प्लॅन तयार कऊ, असे ही त्यांनी सांगितले. तऊण भारत संवाद कार्यालयास त्यांनी गुरूवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे कॉग्रेसचे गट नेते, आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती होती.
दरम्यान, तरूण भारत संवादचे संस्थापक संपादक बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेस खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी कोल्हापूर आवृत्तीचे समन्वयक संपादक सुधाकर काशिद, जाहिरात प्रमुख (शहर) मंगेश जाधव, जाहिरात मांडणी विभाग प्रमुख विजय शिंदे, समन्वयक मुख्य उपसंपादक विश्वास पाटील, उपमुख्य प्रतिनिधी संतोष पाटील, डिटीपी विभाग प्रमुख महादेव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, लोकसभेच्या निवडणूकीमध्ये सर्वानी केलेल्या अथक प्रयत्नामुळे विजयाची खात्री होती. त्याप्रमाणे कोल्हापूरच्या जनतेनेही दिड लाखाहून अधिक मताधिक्याने विजय केले. आता जिह्याच्या विकासासाठी तसेच जनतेला सेवा सुविधा देण्यासाठी आपले प्राधान्य राहिल. काँग्रससह महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्त्याची बैठक घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगिन विकासासाठी प्लॅन तयार करण्याचे नियोजन आहे. यानुसार टप्प्या टप्प्याने विकासकामे करण्यात येतील. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहर प्रमुख आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, प्राचार्य महादेव नरके आदी उपस्थित होते.
विरोधात राहूनही विकास करणे शक्य
केंद्रामध्ये एनडीए आघाडीने सत्तेचा दावा केला आहे. त्यामुळे सध्या तरी इंडिया आघाडी विरोधात असल्याचे चित्र आहे. कोल्हापूरच्या जनतेकडून आपणाकडून विकासकामांच्या अपेक्ष आहेत. विरोधात राहून हे कसे करणार असा प्रश्न विचारला असता खासदार श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, विरोधात राहून ही कामे करता येतात. शासन हे काही केवळ सत्ताधाऱ्यांचेच असते असे नाही तर ते सर्वांचे असते. त्यामुळे केंद्र शासन आपणाल निधी देण्यास नकार देणार नाही. सहाजिकच शासन सत्ताधाऱ्यांना झुकते माप देणार पण माझ्या व्यक्तिमत्वावर जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणू
विशाल पाटील महाविकास आघाडीसोबतच
सांगली लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले. काँग्रेसच्या विचारसरणीचे असल्याने ते महाविकास आघाडीसोबतच राहतील. त्यांच्याशी यासंदर्भात काँग्रेसमधील वरीष्ठ पातळीवर चर्चाही सुरू असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
15 ऑगस्टपर्यत चार तालुक्यात संपर्क कार्यालय
मतदार संघातील नागरांच्या समस्या त्वरीत निर्गत होण्यासाठी तालुका स्तरावर संपर्क कार्यालय काढले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड येथे 15 ऑगस्ट पर्यंत संपर्क कार्यालय सुरू करण्याचा मानस असल्याचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केला.