खासदार शेट्टर यांची संरक्षण विभागाच्या संसदीय स्थायी समितीवर निवड
06:23 AM Sep 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
प्रतिनिधी/ बेळगाव
Advertisement
बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांची संरक्षण विभागाच्या संसदीय स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. शनिवारी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सदस्यांच्या यादीमध्ये खासदार शेट्टर यांचा समावेश आहे. त्यामुळे बेळगाव तसेच परिसरातील संरक्षण मंत्रालयाशी संबंधित समस्या दूर करणे आता सोयीचे होणार आहे.
या समितीमध्ये एकूण 31 जणांचा समावेश आहे. ज्यात राज्यसभेचे 10 व लोकसभेचे 21 सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. या समितीच्या अध्यक्षस्थानी राधामोहन सिंग असणार आहेत.
Advertisement
Advertisement