For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कसबा बावडा आता सीसीटीव्हीच्या कक्षेत...आमदार सतेज पाटील यांच्याकडून 70 सीसी कॅमेरे

02:25 PM Nov 08, 2023 IST | Abhijeet Khandekar
कसबा बावडा आता सीसीटीव्हीच्या कक्षेत   आमदार सतेज पाटील यांच्याकडून 70 सीसी कॅमेरे
Advertisement

कसबा बावडा सचिन बरगे

कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे काम फक्त पोलीस प्रशासनाचे नसून एक जबाबदार नागरिक म्हणून सर्वांचेच असते. हे ओळखून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी कसबा बावड्यात आमदार सतेज पाटील यांच्या सहकार्यातून 70 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. त्यामुळें यंदाच्या दिवाळीपासून कसबा बावडा, लाईन बझार परीसर सीसीटीव्हीच्या कक्षेत आला आहे.

Advertisement

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीने पावन झालेल्या कसबा बावड्यात गेल्या काही महिन्यात समाजकंटकांकडून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. बावड्यातील सामाजिक एकतेला काही अपप्रवृत्ती धक्का पोहोचवत आहेत. घरफोड्या, छोट्या-मोठ्या चोऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी दारू व गांजाचे व्यसन करून सामाजिक शांतता भंग करण्यासारखे अनेक प्रकार घडत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जेवढी पोलीस प्रशासनाची आहे तेवढीच स्थानिक नागरिकांची देखील असल्याचे भान आमदार सतेज पाटील यांनी ठेवले आहे. त्यांच्या सहकार्यातून लाईन बझार, कसबा बावडा परिसरात 70 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत.

कॉलनी आणि गल्ल्यांची रचना असलेल्या कसबा बावडा-लाईन बझार परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लाईन बझार, भगवा चौक ते शुगर मिल कॉर्नर या मुख्य मार्गासह गल्ल्यातील उपमार्गावर सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू आहे. बावड्याच्या पश्चिमेकडील छत्रपती शाहू महाराज जन्म स्थळ ते जय भवानी गल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर ते छत्रपती राजाराम साखर कारखाना, पूर्वेकडील बिरंजे पाणंद ते भगतसिंग वसाहत तसेच मुख्य रस्त्यावर हे कॅमेरे बसवण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. दर रविवारी भरणाऱ्या भाजी मंडईसारख्या गर्दीच्या ठिकाणी मोबाईल, टू व्हिलर तसेच महिलांचे दागिने चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत.

Advertisement

या कॅमेराद्वारे अशा गुन्हेगारीवर लक्ष ठेवून कसबा बावड्यात सामाजिक शांतता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यात येऊ शकते. या सर्व कॅमेऱ्यातील हालचालींवर पूर्णपणे पोलीस प्रशासनाचे कटाक्षाने लक्ष असणार असल्याची माहिती मानसिंग जाधव, प्रदिप उलपे यांनी दिली.
पब्लिक अॅड्रेस सिस्टीम कॅमेरे

बावड्यातील काही ठिकाणी म्हणजे दत्त मंदिर, राजाराम बंधारा परिसर व भाजी मंडई परिसर अशा महत्त्वाच्या, गर्दीच्या ठिकाणी पब्लिक अॅड्रेस सिस्टीम कॅमेरे बसवले आहेत. येथे कोणताही अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास ताबडतोब पोलिस प्रशासन तेथे बसवलेल्या स्पीकरद्वारे सूचना देऊ शकतात. त्यामुळे तेथे घडणाऱ्या अपप्रवृत्तीला आळा बसणार आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत
कसबा बावडा हे ग्रामीण बाज जपणारे मोठे उपनगर असून येथे न्यायालय, महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे स्थानिकांसह इतर नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. परिणामी येथे किरकोळ वादविवाद आणि चोऱ्यांचे प्रमाण आढळून येते. सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला नक्कीच आळा बसेल.

Advertisement
Tags :

.