For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

....नाहीतर मी विसरुन जाईन मी खासदार आहे ; Sanjay Dina Patil पत्रकारांवर संतापले

03:15 PM Jun 25, 2026 IST | NEETA POTDAR
    नाहीतर मी विसरुन जाईन मी खासदार आहे    sanjay dina patil पत्रकारांवर संतापले
Advertisement

Advertisement

मुंबई : नुकतेच शिवसेना (ठाकरे गट) सोडून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पत्रकारांशी वादग्रस्त पद्धतीने संवाद साधल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी विरोधकांना प्रत्युत्तर देताना संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यांच्या त्या विधानावरून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही पोलीस आयुक्तांकडे पत्र पाठवून कारवाईची मागणी केली होती.

Advertisement

याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी संजय दिना पाटील यांना प्रश्न विचारले. मात्र यावेळी ते संतापल्याचे दिसून आले. प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी पत्रकारांशी उग्र भाषेत संवाद साधला. तसेच प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली.

"मी जे बोललो आहे ते उघडपणे बोललो आहे. माझ्यावर चौकशी अथवा कारवाई करायची असेल तर ती करण्यात यावी, त्यासाठी मी तयार आहे," असे संजय दिना पाटील यांनी सांगितले. मात्र यानंतर पत्रकारांशी झालेल्या संवादात त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पत्रकार संघटनांसह विरोधी पक्षांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून, सार्वजनिक पदावरील व्यक्तींनी प्रसारमाध्यमांशी संयमाने वागण्याची अपेक्षा असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Advertisement
Tags :

.