For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आठवडाभर ऊसतोड घेऊ नका,कारखानदारांना पोपटासारखे बोलायला लावू

11:20 AM Nov 18, 2023 IST | Kalyani Amanagi
आठवडाभर ऊसतोड घेऊ नका कारखानदारांना पोपटासारखे बोलायला लावू
Advertisement

खासदार राजू शेट्टी यांचा कुडित्रे येथील सभेत इशारा : ऊस दराचा निर्णय होईपर्यंत ऊसतोड घेऊ नका : कुडित्रे येथील सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचे आवाहन

Advertisement

वाकरे प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस दराचे आंदोलन कोणत्या गट, पक्ष अथवा कारखान्याच्या विरोधात नसून ऊसाला दर मिळवण्यासाठी आहे, शेतकऱ्यांनी आठ दिवस थांबावे, पोपटासारखे कारखानदारांना बोलायला लावू,ऊस दराचा निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी ऊस तोड घेऊ नये,तसेच येत्या रविवारी सर्वत्र चक्काजाम आंदोलन करावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. कुडित्रे (ता. करवीर) येथे कुंभी कासारीवर आयोजित केलेल्या सभेत राजू शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी रामचंद्र पाटील होते.

Advertisement

श्री शेट्टी यांनी महाराष्ट्रातील एकही साखर कारखानदार साधुसंत नाही अशी टीका करून साखर कारखान्यांनी मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षातील हिशोब साखरेला ३२०० ते ३३०० रुपये दर पकडून केला आहे असे सांगितले. मात्र एप्रिल नंतर साखरेला ३८०० रुपये दर मिळाला, यातील उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या आहेत, ते पैसे ऊस शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत असे शेट्टी म्हणाले. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांनी ३ कोटी टन उसाचे गाळप केले असून प्रति टन ४०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना १२०० कोटी रुपये द्यावे लागतात,१७ लाख शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केला आहे, या ३७ कुटुंबातील १२०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वाभिमानीने लढा सुरू केल्याचे ते म्हणाले.

पाच वर्षांपूर्वी एक टन उसाचा उत्पादन खर्च १९२९ रुपये होता,आता तो २६३२ रुपये इतका झाला आहे, गेल्या पाच वर्षात उत्पादन खर्चात ७०३ रुपये वाढ झाली आहे आणि ऊस दरात केवळ २०० रुपये वाढ झालीआहे. शेतकऱ्यांनी लढा दिला तरच पैसे मिळणार आहेत. केंद्र सरकारने जाणीवपूर्वक साखर दरात ५० रुपये कमी केले आहेत, येत्या निवडणुकीपर्यंत हे दर कमी राहणार असे ते म्हणाले. सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे ती त्वरित उठवावी अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांनी ज्वारी, गव्हासारख्या पिकाची पेरणी करावी, ऊस कमी केला तर साखर कारखानदार मागील तो दर देतो ऊस लावा म्हणतील असे ते म्हणाले.

कुंभी कासारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष बाजीराव देवाळकर यांनी प्रास्ताविकात गेले तीन महिने ऊस दरासाठी आंदोलन सुरू असल्याचे सांगितले. यावेळी दादू कामीरे, ज्ञानदेव पाटील (साबळेवाडी), दगडू गुरुवळ, रामराव चेचर, मुकुंद पाटील, राजेंद्र सूर्यवंशी पांडुरंग शिंदे,प्रा.टी.एल. पाटील, विष्णू राऊत, शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेला बाजीराव पाटील (दोनवडे), बाजीराव पाटील (खुपिरे) यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी शेतकऱ्यांनी शपथ घेतली.

     म्हणे १९६० ची शेतकरी संघटना

दादू कामीरे यांनी यावेळी बोलताना शरद जोशींची संघटना १९७९ मध्ये स्थापन झालेली असताना आपण १९६० पासून शेतकरी संघटनेत काम करत असल्याचे   सांगून अत्यंत अश्लील भाषा वापरली.

सरकार सोडा तलाठी चौकशी करेना- राजू शेट्टी यांनी राज्य सरकार सोडाच, पण साधा तलाठी देखील आपली आपल्या आंदोलनाची चौकशी करीत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.

 ४५० रुपयांची लूट 

केंद्र व राज्य सरकार १ टन उसापासून शेतकऱ्यांकडून ४५० रुपयांची कर रूपाने लूट करतात आणि शेतकरी शेतात गाढवासारखे राबतो असे राजू शेट्टी म्हणाले.

दालमियाचा २५० कोटी रुपये नफा

राजू शेट्टी यांनी दत्त दालमिया सहकारी साखर कारखान्याला २५० कोटी रुपयांचा फायदा झाल्याची सांगून येथे १९ नोव्हेंबर रोजी या कारखान्यासमोर सभा घेऊन पंचनामा करणार असल्याचे सांगितले.

Advertisement
Tags :

.