महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

खासदार प्रियांका जारकीहोळी रविवारी निपाणी दौऱ्यावर

07:10 PM Jul 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
MP Priyanka Jarkiholi
Advertisement

निपाणी प्रतिनिधी

गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पावसामुळे निपाणी तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी खासदार प्रियांका जारकीहोळी या रविवारी निपाणी दौऱ्यावर येणार आहेत.

Advertisement

रविवारी सकाळी 11 वाजता संकेश्वर येथे पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर 12 वाजता निपाणी तालुक्यात जत्राट, 12.30 वाजता यमगर्णी, 1 वाजता हुन्नरगी आणि दुपारी 2 वाजता सिदनाळ येथे भेट देऊन पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आजी-माजी लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित असणार आहेत, अशी माहिती जिल्हा काँग्रेस आणि बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :
Flood situationMP Priyanka Jarkiholinipani
Next Article