महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खासदार प्रियांका जारकीहोळी यांचा सत्कार

11:00 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : केएलएस गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या माजी विद्यार्थी संघटनेची बैठक नुकतीच के. के. वेणुगोपाल सभागृहात पार पडली. बी.कॉम., बीबीए, बीसीए व एम.कॉम.च्या  माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी व खासदार प्रियांका जारकीहोळी यांना निमंत्रित केले होते. जीसीसीचे अध्यक्ष ए. के. तगारे व संचालक मंडळाच्यावतीने प्रियांका यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रा. दीपा तंगणकर यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रियांका यांनी विद्यार्थी कल्याणावर आपले लक्ष नेहमी असेल, असे सांगून सत्काराबद्दल आनंद व्यक्त केला. या बैठकीत बीकॉमच्या समन्वयक प्रा. नयना रायचूर, बीबीएचे समन्वयक प्रा. राहुल कामुले, बीसीए समन्वयक डॉ. अस्मिता देशपांडे, एम.कॉम. समन्वयक डॉ. एस. व्ही. जवळकर, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने बैठकीची सांगता झाली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article