महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नवनिर्वाचित खासदार नारायण राणेंचे बांद्यात भव्य स्वागत

07:55 PM Jun 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मयुर चराटकर
बांदा

Advertisement

सिंधुदुर्ग रत्नागिरीचे नवनिर्वाचित खासदार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भाजपच्या वतीने बांदा येथे जंगी स्वागत केले. निवडून आल्यावर प्रथमच श्री राणे सावंतवाडी तालुका दौऱ्यावर आले . यावेळी कार्यकर्त्यामध्ये अनोखा उत्साह दिसत होता ढोल ताशाचा गजर, राणे साहेब आगे बढो अश्या गगनचुंबी घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

Advertisement

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देत राणे यांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सभापती प्रमोद कामत, शीतल राऊळ, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, बांदा उपसरपंच बाळू सावंत, माजी उपसरपंच जावेद खतीब, महिला तालुकाध्यक्ष रुपाली शिरसाट, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विलास पावसकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, माजी सरपंच बाळा आकेरकर, दीपक सावंत, निलेश कदम, ज्ञानेश्वर सावंत, गुरू सावंत, गुरू कल्याणकर, साई धारगळकर, दर्पण आळवे, शुभम साळगावकर, दादू कवीटकर, औदुंबर पालव, अशोक सावंत, नंदू सावंत,  हेमंत मराठे , उमेश पेडणेकर आदी सह जिल्हाभरातून कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी खासदार राणे यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. तर माजी सभापती प्रमोद कामत यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत स्वागत केले.

Advertisement
Tags :
# narayan rane # sindhudurg # tarun Bharat news update #
Next Article