For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासदार नारायण राणे चषक २०२५ चे दिमाखात उद्घाटन

04:40 PM Apr 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
खासदार नारायण राणे चषक २०२५ चे दिमाखात उद्घाटन
Advertisement

उद्योजक प्रसन्नजी घोडगे यांनी खेळाडूंना दिल्या शुभेच्छा...

Advertisement

सावंतवाडी: माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व युवासेना सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित खासदार चषक २०२५ चे उद्घाटन उद्योजक प्रसन्नजी घोडगे यांच्या हस्ते जिमखाना मैदान येथे मंगळवारी पार पडले. यावेळी श्री. घोडगे यांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.या उद्घाटनप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाध्यक्षा सौ. निता सावंत कविटकर, सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, माजी जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, शहर कार्यकारिणीच्या शहराध्यक्षा सौ. भारती मोरे, युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर, विधानसभा अध्यक्ष अर्चित पोकळे, शहरप्रमुख निखिल सावंत, देव्या सूर्याजी, वर्धन पोकळे, संकल्प धारगळकर, रोहित पोकळे, नील प्रभू , चेतन गावडे, साईश वाडकर, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, प्रथमेश प्रभू, देवेश पडते, दिग्विजय मुरगुड, वसंत सावंत, मुकेश ठाकूर, गणेश कुडव, शैलेश मेस्त्री आदी उपस्थित होते.उद्घाटनप्रसंगी श्री. घोडगे म्हणाले, खेळामध्ये हार जीत होत असते. आपण ही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडून पुढील वर्षी याहून मोठा भव्य दिव्य खासदार चषक आयोजित करूया असे प्रतिपादन केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.