महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

खासदार जगदीश शेट्टर-विश्वेश्वर हेगडे यांची सांबरा गावाला भेट

10:58 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सांबरा : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर व उत्तर कन्नड मतदारसंघाचे खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी शुक्रवार दि. 19 रोजी सांबरा गावाला भेट दिली व श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. प्रारंभी श्री महालक्ष्मी देवस्थान कमिटीच्या वतीने दोघांचाही शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असून अनेक विकासकामे राबविणार असल्याची ग्वाही यावेळी खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली. याप्रसंगी माजी आमदार संजय पाटील, अनिल बेनके, अरविंद पाटील बैलहोंगलचे माजी आमदार दोडगौडर, धनंजय जाधवसह श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई, उपाध्यक्ष भरमगौडा पाटील, सेक्रेटरी वाय. के. धर्मोजी, सदस्य सिद्राय य•ाr, रामचंद्र देसाई, गंगाधर तीम्मापूरमठ, सुराप्पा देसाई, ग्रा. पं. अध्यक्षा रचना गावडे, उपाध्यक्ष माऊती जोगानीसह सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article