महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खासदार हेगडे-कागेरी यांची खानापूरला धावती भेट

10:51 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विविध मागण्यांसाठी आमगाव-निलावडेवासियांचे, तसेच विनाअनुदानित शाळा शिक्षक संघटनेचे निवेदन

Advertisement

खानापूर : खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी सोमवारी खानापूर येथे धावती भेट दिली. ते कित्तूर येथील भाजपच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना खानापूर येथील विश्रामधामात भेट दिली. आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी विनाअनुदान शिक्षक संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. तसेच आमगाववासियांनी स्थलांतराबाबत तर निलावडे येथील ग्रामस्थांनी हत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांना दिले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, गुंडू तोपिनकट्टी, सदानंद पाटील, सुरेश देसाई, बाबुराव देसाई, पंडित ओगले यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांने निवडणुकीनंतर प्रथमच खानापूरला धावती भेट दिली. यावेळी विनाअनुदानित शाळा शिक्षक संघटनेच्यावतीने 1995 पासून विनाअनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कर्नाटक माध्यमिक शाळा महाविद्यालय नोकर संघटनेच्यावतीने भेट घेऊन आपल्या समस्यांचे निवेदन दिले. यावेळी सलीम कित्तूर, बी. बी. होसूर, सी. एस. कदम, शांताराम यळळूरकर, अरुण पाटील, आर. सी. केसरकर, एस. एस. नंद्याळकर यासह शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संघटनेच्यावतीने खासदार हेगडे यांचा शाल आणि भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. आणि 1995 पासून विनाअनुदानित शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांच्या समस्यांबाबत निवेदन दिले. तसेच या शाळांना तात्काळ अनुदान मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी  यांनी आपण शिक्षण मंत्री असताना या समस्या जवळून पाहिल्या आहेत. यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

आमगाव ग्रामस्थांचे स्थलांतरबाबत ताडतीने नियोजन करण्याची मागणी

आमगाव येथील ग्रामस्थांनी स्थलांतर करण्याबाबत ताडतीने नियोजन करावे, तसेच योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, आणि योग्य ठिकाणी आमचे स्थलांतर करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन दिले. तर निलावडे ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील नागरिकांनी गेल्या तीन महिन्यांपासून हत्तीचा उपद्रव सुरू असून या हत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेती करणे अवघड बनले आहे. यासाठी या हत्तींचा बंदोबस्त तातडीने करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन दिले.

खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी वनाधिकारी निंबरगी यांना दूरवध्वनीवरुन संपर्क साधून हत्तीचा बंदोबस्त करण्याबाबत सूचना केल्या. तसेच तालुक्यातील परवानाधारक बंदूक वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला बंदूक परवाना गेल्या वर्षभरापासून देण्यात येत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अडवणूक होत असल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया जाणार असल्याने तातडीने बंदूक परवाना नुतीनकरण करून देण्यात यावा, अशी मागणी केली. खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून खानापूर तालुक्यातील परवानाधारक बंदूक मालकांना तातडीने परवाना नुतनीकरण करून देण्यात यावा, अशी सूचना केली. यानंतर खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी हे कित्तूरकडे रवाना झाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article