For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झारखंडमधील खासदार गीता कोडा भाजपमध्ये

06:22 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
झारखंडमधील खासदार गीता कोडा भाजपमध्ये
Advertisement

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

लोकसभा निवडणुकीपूर्वी झारखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या खासदार गीता कोडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गीता कोडा या राज्याचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी आहेत. गीता कोडा यांच्या प्रवेशावेळी मधु कोडा हेदेखील भाजप कार्यालयात पोहोचले होते.

Advertisement

मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडा सध्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील चाईबासा मतदारसंघातील खासदार आहेत. गीता कोडा काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार आहेत. निवडणुकीपूर्वी झारखंडमध्ये भाजपचे हे मोठे पाऊल मानले जात आहे. मधू कोडा यांच्या पत्नी गीता कोडा या राज्यात काँग्रेस पक्षाने केलेल्या आघाडीवर खूश नाहीत. छत्तीसगडच्या पावलावर पाऊल ठेवत भाजप राजमहल आणि चाईबासा या गमावलेल्या जागांवर वेळेआधीच उमेदवार जाहीर करणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. अलीकडच्या काळात झारखंडच्या राजकारणात कुर्मी जातीचा एक महत्त्वाचा चेहरा मानल्या जाणाऱ्या माजी खासदार शैलेंद्र महतो यांचा भाजपमध्ये समावेश करणे हाही याच रणनीतीचा एक भाग होता. शैलेंद्र महतो यांच्यानंतर आता पक्षाच्या नजरा गीता कोडा यांच्यावर खिळल्या होत्या.

Advertisement
Tags :

.