सावंतवाडीत ८ एप्रिल पासून खासदार चषक क्रिकेट स्पर्धा
शिवसेना सावंतवाडी तालुका युवासेनेचे आयोजन
ओटवणे | प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब पुरस्कृत आणि सावंतवाडी तालुका युवासेना आयोजित 'एक गाव, एक संघ' आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मर्यादीत खासदार चषक २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंगळवार ८ ते १० एप्रिल रोजी सावंतवाडी जिमखाना मैदान स्वार हॉस्पिटल समोर येथे होणार असल्याची माहिती स्पर्धा आयोजन प्रमुख देव्या सूर्याजी आणि युवासेना तालुका प्रमुख प्रतिक बांदेकर यांनी दिली.या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रुपये १ लाख व आकर्षक पारितोषिक, उप विजेत्या संघाला रोख ५० हजार व आकर्षक पारितोषिक दिले जाणार आहे. या क्रिकेट स्पर्धेत प्रथम येणाऱ्या १६ संघांना स्पर्धेत प्रवेश दिला जाणार असून संपूर्ण स्पर्धा साखळी (league) पध्दतीने खेळवली जाणार आहे. प्रत्येक दिवशी ८ संघ खेळतील. (4- 4 चे दोन ग्रूप), सर्व सामने ४ षटकांचे होणार आहेत. संघ निश्चित करण्याची अंतीम तारीख रविवार ६ एप्रिल असून स्पर्धेला येताना प्रत्येक खेळाडूने आधारकार्ड घेऊन येणे बंधनकारक आहे. खेळाडूने ट्रॅक पँट व शूज घालून खेळणे बंधनकारक असून कोणत्याही खेळाडूस दुखापत झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.प्रत्येक दिवशी स्पर्धा सकाळी ठीक ९ वाजता सुरु करण्यात येतील. कोणत्याही क्षणी स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार मंडळाकडे राहील व पंचाचा निर्णय अंतिम राहील. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील संघानी या या क्रिकेट स्पर्धेत सहभाग घ्यावा असे युवासेना तालुका प्रमुख प्रतिक बांदेकर यांनी केले. अधिक माहितीसाठी संपर्क देव्या सूर्याजी ८२७५६५२०७३ आणि प्रतीक बांदेकर व आशुतोष चिटणीस यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सावंतवाडी तालुका युवासेनेच्यावतीने करण्यात आले आहे.यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख प्रतीक बांदेकर, देव्या सुर्याजी, विधानसभा प्रमुख अर्चित पोकळे, सातुळी बावळाट उपसरपंच स्वप्निल परब, अनिकेत पाटणकर, साईश वाडकर, प्रथमेश प्रभू, चेतन गावडे, सुरज मठकर, शैलेश तळवडेकर, श्याम जाबरे आदी उपस्थित होते.