Kolhapur News : MP असदुद्दीन ओवेसींनी कोल्हापुरातील कार्यालयाचे उद्घाटन का टाळले?
बागल चौक परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
कोल्हापूर : एमआयएम पक्षाच्या कोल्हापूरातील कार्यालयाच्या उद्घाटनावरुन सोमवारीही शहरातील बागल चौकात तणाव कायम होता. ओवेसी यांच्या हस्ते शहरात एमआयएमच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार होते, मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पक्षकार्यालयाचे उद्घाटन करणे टाळले. मात्र या तणावामुळे बागल चौक परिसरात सोमवारी दिवसभर कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.
शनिवारी आणि रविवारी हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस प्रशासनास निवेदन देवून विरोध दर्शविला होता. एमआयएम पक्षाचे कार्यालय इमारतीच्या पार्किंगमध्ये आहे. अनधिकृतरित्या ते उभारण्यात येत असल्याची तक्रारही सकल हिंदू समाजाच्यावतीने केली होती. तसेच ओवेसी यांनी कोल्हापुरात वादग्रस्त वक्तव्य केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा देत, मारुती मंदिर परिसरात महाआरती करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सोमवारी येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
हिंदुत्ववादी संघटनांकडून घोषणाबाजी खासदार असदुद्दीन ओवेसी सोमवारी बागल चौक येथील कार्यालयाचे उद्घाटनासाठी येणार असल्यामुळे सकाळ 11 वाजल्यापासून मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमा झाले होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास खासदार ओवेसी यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी स्वागतासाठी गेलेल्या एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. याचा व्हिडीओ हिंदुत्ववादी संघटनांपर्यंत पोहोचला. यानंतर बागल चौक येथील तणावामध्ये आणखीनच भर पडली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्री राम अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. उद्घाटन नाहीच दरम्यान एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी ओवेसी यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन होणारच असा पवित्रा दोन दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र महापालिकेच्या वतीने पक्षाचे कार्यालय अनधिकृत आहे. येथील अतिक्रमण काढून घ्यावे अशी नोटीस पार्किंग मालकांना दिली होती. सोमवारी सकाळीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या पार्किंगकडे जाणारी वाट बंद केली होती. तसेच पोलीस प्रशासनानेही कार्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमास परवानगी नाकारली होती.
यामुळे खासदार ओवेसी यांनी बागल चौक येथील पक्षाच्या कार्यालय उद्टनास येणे टाळले. यामुळे कार्यालयाचे उद्घाटनच होवू शकले नाही. हिंदुत्ववादी संघटनांकडून घोषणाबाजी खासदार असदुद्दीन ओवेसी सोमवारी बागल चौक येथील कार्यालयाचे उद्घाटनासाठी येणार असल्यामुळे सकाळ 11 वाजल्यापासून मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमा झाले होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास खासदार ओवेसी यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले.
यावेळी स्वागतासाठी गेलेल्या एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. याचा व्हिडीओ हिंदुत्ववादी संघटनांपर्यंत पोहोचला. यानंतर बागल चौक येथील तणावामध्ये आणखीनच भर पडली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्री राम अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
उद्घाटन नाहीच दरम्यान एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी ओवेसी यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन होणारच असा पवित्रा दोन दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र महापालिकेच्या वतीने पक्षाचे कार्यालय अनधिकृत आहे. येथील अतिक्रमण काढून घ्यावे अशी नोटीस पार्किंग मालकांना दिली होती. सोमवारी सकाळीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या पार्किंगकडे जाणारी वाट बंद केली होती.
तसेच पोलीस प्रशासनानेही कार्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमास परवानगी नाकारली होती. यामुळे खासदार ओवेसी यांनी बागल चौक येथील पक्षाच्या कार्यालय उद्टनास येणे टाळले. यामुळे कार्यालयाचे उद्घाटनच होवू शकले नाही.
बागल चौकात पोलीस बंदोबस्त
दरम्यान बागल चौक परिसरात सोमवार सकाळ पासूनच प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळपासूनच पोलीस निरीक्षक संतोष डोके, सुशांत चव्हाण, संजीव झाडे, पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे हे बागल चौक परिसरात थांबून होते. व्यवहार बंद, वाहतूक वळविली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बागल चौक परिसरातील काही दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच या मार्गाकडे येणारी वाहतूक शाहूमिल मार्गे वळविण्यात आली होती. दुपारनंतर येथील वाहतूक सुरळीतकरण्यात आली.