आनंदाकडे वाटचाल
आनंद क्रमवारीत 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये 147 देशांच्या उतरंडीत 126 वरून 118 असा प्रवास आनंद वाढवणारा आहे. तथापि आपण नेपाळ, पाकिस्तान यांच्या मागे आहोत. नेपाळ 92 स्थानावर व पाकिस्तान 109 स्थानावर आहेत. श्रीलंका 133 व बांगलादेश 134 क्रमांकावर आहेत. सर्वात तळामध्ये सातत्याने अफगाणिस्तान असून (147) लेबनॉन, मालावी व झिंबावे यांचा क्रमांक लागतो. आनंदाचा स्तर केवळ राष्ट्रीय उत्पन्नावर आधारित नसतो हे या अहवालातून स्पष्ट होते.
आर्थिक प्रगती सोबत एकूण सामाजिक कल्याण, लोकांचे राहणीमान वाढणे अपेक्षित असते. आर्थिक प्रगती सर्वसमावेशक किंवा ‘सब का साथ-सबका विकास’ अशी वास्तवात असेल तर त्या सोबत सामाजिक कल्याण वाढते. भारत गेल्या दशकात आपले राष्ट्रीय उत्पन्न 105 टक्क्याने वाढवू शकला व आर्थिक विकासाचा 7 ते 8 टक्के ठेवू शकला हे निश्चितच दिलासादायक ठरते. जागतिक अर्थव्यवस्थांची राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावर केली जाणारी क्रमवारी आपणास आनंद देणारी आहे. आपण अमेरिका, चीन, जर्मनी, जपाननंतर 5 व्या क्रमांकावर असून लवकरच जपानला मागे टाकत चौथ्या स्थानावर पोहचू शकू असा विश्वास आहे. पण या सोबत अमेरिकेचे राष्ट्रीय उत्पन्न 30 लाख कोटी डॉलर्स, चीनचे 19 लाख कोटी डॉलर्स, जर्मनी 4.9 लाख डॉलर्स तर जपान 4.4 लाख डॉलर्स व भारत 4.3 लाख डॉलर्स अशी स्थिती आहे. क्रयशक्ती समानता निकषावर भारत जागतिक क्रमवारीत तिसरी महासत्ता ठरतो. मात्र दरडोई उत्पन्न क्रमवारीत 140 व्या क्रमांकावर भारत दिसतो. 2047 पर्यंत प्रगत किंवा ‘विकसित’ भारत हा केवळ 30 लाख कोटीची अर्थव्यवस्था करणे एवढ्यावर समाधान मानता येणार नाही. कारण ‘विकास’ मोजण्याचे जे अनेक गुणात्मक निकष आहेत त्याला आपण ‘आनंद’ क्रमवारीत कुठे आहोत हेही पहावे लागेल. प्रगत किंवा विकसित भारत या सोबत ‘आनंदी’ भारताचे लक्ष्य देखील महत्त्वाचे ठरते!
आनंदाचे मोजमाप- आनंद प्राप्ती हेच अंतिम उद्दिष्ट मानवी जीवनाचे समग्र तसेच वैयक्तिक पातळीवर असते. आपला शेजारी ‘भूतान’ या राष्ट्राने आनंदास प्राधान्य देऊन राष्ट्रीय उत्पन्नाऐवजी राष्ट्रीय आनंद मापन केले. 20 मार्च हा ‘जागतिक आनंद दिवस’ म्हणून साजरा होतो. 2012 पासून संयुक्त राष्ट्र संघामार्फत जागतिक आनंद अहवाल सादर केला जातो. यासाठी 147 देशांच्या आनंद क्रमवारीसाठी 0 ते 10 या स्केलवर लोकांच्या प्रतिक्रिया मोजल्या जातात. सहा विविध निकषांमध्ये दरडोई राष्ट्रीय उत्पन्न, सामाजिक सुरक्षा, आरोग्यपूर्ण जीवन, अपेक्षित आयुर्मान, निवड स्वातंत्र्य, दातृत्व आणि भ्रष्टाचाराबद्दल मत असे निकष वापरुन त्या आधारे एकूण आनंद निर्देशांक मोजला जातो. परस्परिक विश्वास, सामाजिक सलोखा किंवा नातेसंबंध, सहभागी भोजन व सामाजिक किंवा सामुदायिक उदारपणा या घटकांवर आनंद अवलंबून असतो. हा केंद्रबिंदू ठेवून 2025 चा जागतिक आनंद अहवाल ‘काळजी घेणे व सहभागीता’ (ण्arग्हु aह् एप्arग्हु) या विषयावर आधारित आहे. आनंद क्रमवारीत सातत्याने 8 व्या वर्षी प्रथम स्थानावर फिनलंड असून 7.736 इतका स्कोर आहे. यानंतर डेन्मार्क, आईसलँड, स्वीडन, नॉर्वे असून प्रथमच पहिल्या 10 मध्ये कोस्टारिका आणि मेक्सिको यांचा समावेश होतो.
भारताचा आनंद वाढला!
आनंद क्रमवारीत 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये 147 देशांच्या उतरंडीत 126 वरून 118 असा प्रवास आनंद वाढवणारा आहे. तथापि आपण नेपाळ, पाकिस्तान यांच्या मागे आहोत. नेपाळ 92 स्थानावर व पाकिस्तान 109 स्थानावर आहेत. श्रीलंका 133 व बांगलादेश 134 क्रमांकावर आहेत. सर्वात तळामध्ये सातत्याने अफगाणिस्तान असून (147) लेबनॉन, मालावी व झिंबावे यांचा क्रमांक लागतो. आनंदाचा स्तर केवळ राष्ट्रीय उत्पन्नावर आधारित नसतो हे या अहवालातून स्पष्ट होते. महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचा क्रमांक 24 वा तर इंग्लंड 23 व्या क्रमांकावर आहे.
आनंदासाठी सामाजिक संबंध, कौटुंबिक संबंध, दातृत्व किंवा मदतीची प्रवृत्ती हे गुणात्मक घटक आनंद अहवालातून स्पष्ट होतात. रस्त्यात पडलेले पैशाचे पाकीट किती लोक परत करतात, असा प्रयोग अनेक ठिकाणी करण्यात आला व अपेक्षेपेक्षा अधिक लोकांनी पाकीट परत केले! (अर्थात हा प्रयोग भारतात नव्हता!) गरजू व्यक्तीस मदत करणे ही कृती मदत देणाऱ्याप्रमाणे घेणाऱ्यासही आनंद देत असल्याने मदतीचा 1 रुपया आनंदामध्ये त्यापेक्षा अधिक पटीने वाढ करीत असतो. आनंदाच्या पहिल्या 10 देशांच्या क्रमवारीत मर्यादित लोकसंख्या हा एक महत्त्वाचा घटक आहे. विशेषत: भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या आकारास आनंदी करणे आव्हानात्मक ठरते.
धोरण सूत्र- लोक आनंदी कोणत्या परिस्थितीत असतात व कोणत्या कारणाने तणावग्रस्त होऊन मृत्यू स्वीकारतात याबाबतची प्रायोगिक, निरीक्षणात्मक, संशोधनपूर्ण माहिती आपणास धोरण सूत्र ठरवणेस मदत कारक ठरतो. ‘विकसित भारत’ केवळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकारावर आनंदी भारत होणार नाही हा अप्रत्यक्ष सल्ला यातून मिळतो. महत्त्वाचे म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेत आणि व्यवहारात असणारी आचरणमूल्ये ही आनंद वाढवण्यास महत्त्वाचे घटक ठरू शकतात. काळजीवाहू अर्थव्यवस्था कुटुंबापासून सुरु होते व त्यात महिलांचा वाटा मोठा आहे. त्यांना सक्रियपणे व सन्मानाने अधिक प्रोत्साहित केल्याने आनंद वाढेल. आनंद क्रमवारीत पुढे असणारे सर्व देश आपल्या नागरिकांना पुरेशा सामाजिक सुरक्षा, पेन्शन, आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधा तर देतातच पण त्यापेक्षा लोकांचा सरकारवर, पर्यायाने अधिकारी, नेते, यांच्यावर विश्वास असतो व भ्रष्टाचाराबाबत अनुभवजन्य प्रतिक्रिया त्या देशांचा आनंद निर्देशांक वाढवतो. कोरोनानंतर नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या (अtप् द एज्aग्r) घटल्या असून वाढती उत्पन्न विषमता आनंद घटवणारी आहे. कुटुंबात असणारे सदस्य 5 पेक्षा वाढल्यास आनंद घटतो हाही निष्कर्ष महत्त्वाचा ठरतो. पण त्याचसोबत कुटुंबात ‘सहभोजन’ आनंद वाढवते हे खरे असले तर एकट्याने जेवणारे यांचे प्रमाण वाढत असल्याचे म्हटले आहे.
भारतीय घटनेने कल्याणकारी राज्याचे ध्येय स्वीकारले असून लोकशाही रचनेत लोक कल्याणकारी योजना, आपत्ती मदत याचा वापर कौशल्यपूर्वक सत्तासोपान बळकट करण्यासाठीच वापरले जाते! सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी भूतकालीन घटना ऐरणीवर आणून विकासाचे, न्यायाचे प्रश्न मागे ठेवणे आनंद घटवणारेच ठरेल. लाडकी बहीण, मोफत अन्नधान्य अशा योजना आनंद वाढवतात का? याचा अभ्यास मार्गदर्शक ठरेल. आगामी कालखंडात तंत्रप्रगती व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) रोजगार घटवणार असून ‘जैसे थे’ धोरण आपत्तीचे आमंत्रण ठरू शकते. प्रचंड मोठ्या रिकाम्या लोकसंख्येचा टाईम बॉम्ब हा अणूबाँबपेक्षा भयावह ठरू शकतो व त्यासाठी कामाचे अथवा रोजगाराचे रेशनिंग करावे लागेल. आपला रिकामा वेळ चांगल्या प्रकारे उपयुक्त ठरेल यासाठी प्रशिक्षण व मानसिकता बदल करावे लागतील. आयुष्मान भारत, रोजगार हमी, सर्वांना विमा व पेन्शन या दिशेने आपण मंद गतीने का होईना पण वाटचाल करीत आहोत, ही स्वागतार्ह बाब आहे. शंभरी पार आनंद क्रम राष्ट्रीय कल्याण धोरणात आमुलाग्र बदल करण्याची निकड स्पष्ट करतो.
-प्रा. डॉ. विजय ककडे