कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धावत्या आयशर टेम्पोला आग

12:44 PM Jun 30, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

म्हसवड :

Advertisement

सातारा-लातूर या राज्य महामार्गावर माण तालुक्यातील पिंगळी गावच्या हद्दीतील शेलारवस्तीनजीक शनिवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान पंढरपूर नजिकच्या भंडीशेगाव येथील आयशर टेम्पोने रस्त्यावरच अचानक पेट घेतला. काही वेळातच टायरने पेट घेतल्यामुळे धुराचे व आगीचे लोट परिसरात पसरल्याचे पाहून अनेकजण भयभीत झाले.

Advertisement

दरम्यान, टेम्पोला आग लागताच ड्रायव्हरने खाली उडी मारून मदतीसाठी आरडाओरड केला. रस्त्यावरुन येणारी-जाणारी वाहने या प्रचंड आगीमुळे थांबली गेली. वडूज नगरपंचायतीच्या अग्निशमनलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. जवळपास एक तासाभरानंतर ही आग आटोक्यात आली. मात्र, रस्त्यावरील या बर्निंग थरथराटाने हा परिसर चांगलाच भयभीत झाला होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवार, दि. २८ जून रोजी लातूर-सातारा रोडवरून पंढरपूरनजीकच्या भंडीशेगाव येथील आयशर टेम्पो क्रमांक एमएच १३ सीयू २७७८ हा पंढरपूरवरुन प्लायवूड भरून सातारा येथे उतरण्यासाठी निघाला होता. पिंगळी खुर्द गावाजवळील शेलारवरती याठिकाणी आयशर टेम्पो आला असता टेम्पोने अचानक पेट घेतला. काही वेळातच आग टेम्पोच्या पुढील बाजूला लागल्याने ड्रायव्हर वैभव युवराज ननावरे (वय ३५) याने उडी मारून आरडाओरड करून नजीकच्या लोकांना बोलावले. नागरिकांनी दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि दराडे यांना फोन करुन सदर घटनेची माहिती दिली. काही वेळातच सपोनि दराडे टीमसह घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली. त्याच दरम्यान वडूज नगरपंचायतीचा अग्निशमन घटनास्थळी दाखल झाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील व त्यांचे सहकारी शेखर गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू जाधव अॅम्बुलन्स घेऊन घटनास्थळी आले. त्यांनी ड्रायव्हर ननावरे यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. तर अग्निशमनच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जवळपास एक तासाभरानंतर ही आग आटोक्यात आली. या घटनेत टेम्पोचे तसेच टेम्पोमधील प्लायवूड पूर्णतः जळाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून सपोनि दराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article