For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘द केरळ स्टोरी 2’ चित्रपट येतोय

07:00 AM Feb 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘द केरळ स्टोरी 2’ चित्रपट येतोय
Advertisement

2023 मध्ये प्रदर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता निर्माते याचा सीक्वेल घेऊन येत असून याचे मोशन पोस्टर आणि टीझर जारी करण्यात आला आहे. पडद्यावर आणखी एक भीतीदायक कहाणी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट अत्यंत गाजला होता, परंतु याचबरोबर मोठा वादही निर्माण झाला होता. विपुल अमृतलाल शाह या निर्मात्याने आता ‘द केरळ स्टोरी 2 : गोज बियॉन्ड’ आणला आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये काही महिलांचे चेहरे दाखविण्यात आले आहेत. दहशत आणि भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतेय. त्यांच्या कपाळावर टिळा असून तो धुसर होतोय आणि याचबरोबर जखमांच्या अनेक खुणाही दिसून येत आहेत.  या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कामाख्या नारायण सिंह यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट 27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित केला जाईल. यावेळी चित्रपटात नवे कलाकार दिसून येतील. यात उल्का गुप्ता, अदिति भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.