For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरातील उड्डाणपुलासाठी हालचाली गतिमान

06:28 AM Jun 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
शहरातील उड्डाणपुलासाठी हालचाली गतिमान
Advertisement

आठवडाभरात निविदा प्रक्रिया मागविण्याची शक्यता

Advertisement

बेळगाव शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय ठरणारा आणि मागील अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या उ•ाणपुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 270 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आता निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात त्या मागविल्या जाणार आहेत.

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव : निविदा प्रक्रियांचे काम सुरू असतानाच बेळगाव शहरातही उ•ाणपुलाच्या कामाला गती मिळाली आहे. उ•ाणपुलाच्या मार्गावर येणाऱ्या झाडांचे सर्वेक्षण करून त्यांना क्रमांक देण्याचे काम अलिकडेच सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभाग यांच्या समन्वयातून करण्यात आले. याबरोबरच अलाइन्मेंट मार्किंग देखील करण्यात आले आहे. गांधीनगर येथील राष्ट्रीय महामार्गापासून मध्यवर्ती बसस्थानकापर्यंतच्या पट्ट्यामध्ये रस्त्यावर पिलर अलाईन्मेंट इंडिकेटर्स लावण्यात आले आहेत.

मार्ग शहराच्या अत्यंत वर्दळीच्या भागातून जाणार

हा प्रकल्प सुरुवातीच्या टप्प्यात 4.5 कि. मी. लांबीचा साकारला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गापासून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत उ•ाणपूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा मार्ग शहराच्या अत्यंत वर्दळीच्या भागातून जाणार आहे. पुढील तीन ते चार वर्षांत हे बांधकाम पूर्ण करण्यासाठीचे नियोजन केले जात आहे.

वाहतूक कोंडी कमी होणार

उ•ाणपुलाच्या बांधकामासाठी सर्व विभागांना परस्परांमध्ये समन्वय राखण्याच्या सूचनाही काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिल्या होत्या. सदर उ•ाणपूल झाल्यास शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

Advertisement
Tags :

.