निवडणुका जवळ आल्या कि नेत्यांना बैलगाडी आठवते...त्यांच्या पराभवात चळवळीचं यश आहे- सदाभाऊ खोत
निवडणूका जवळ आल्या की काही लोकांना बैलगाडी, नांगर, मळकी कपडे आठवत असल्याची बोचरी टिका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यावर केली आहे. तसेच प्रकाश आवाडे यांचा स्वतंत्र पक्ष असून त्यांनी उमेदवारी मागणं गैर म्हणता येणार नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला आहे.
पहा VIDEO >>>काही लोकांना निवडणुका आल्या की बैलगाडी आठवते; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टी यांना टोला
आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी महायुतीचे अनेक नेत्यांनी कोल्हापूरात झाडून हजेरी लावली. य़ावेळी सदाभाऊ खोतांनीही हजरी लावून महायुतीच्या उमेदवारांना पाठींबा दिला.
यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टिका केली. ते म्हणाले, "काही लोकांना निवडणुका जवळ आल्या कि बैलगाडी, नांगर, खिळा, कोयता मळकी कपडे आठवतात. पण अशा नेत्यांचा पराभव हातकणंगलेची जनता करणार असून या नेत्यांच्या पराभवातच शेतकरी चळवळीचं भविष्य दडलेलं आहे." असे ते म्हणाले.
आवाडे यांचे बंड पेल्यातील वादळ...
हातकणंगले मध्ये प्रकाश आवाडे यांनी केलेल्या बंडावर पत्रकारांनी छेडले असता त्यांनी आमदार प्रकाश आव्हाड यांचं बंड म्हणता येणार नसल्याचं म्हटलं आहे. प्रकाश आवाडे यांचा स्वतंत्र पक्ष, स्वतंत्र आघाडी आहे त्यामुळे त्यांनी उमेदवारी मागणं गैर म्हणता येणार नाही. उमेदवारी बाबत त्यांच्या आणि माझ्या दोन-तीन वेळा चर्चा झाल्या होत्या मात्र त्यांनी महायुती सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे यांचं बंड म्हणजे पेल्यातील वादळ असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित आज अर्ज दाखल होत असून जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा महायुतीच जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.