For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेशन दुकानदारांचे धरणे आंदोलन

07:03 PM Dec 01, 2023 IST | Kalyani Amanagi
रेशन दुकानदारांचे धरणे आंदोलन
Advertisement

रेशनमधील कालबाह्य नियम बदलण्यासह विविध मागण्यांचा समावेश : मागण्या मान्य झाल्यास 1 जानेवारीपासून देशव्यापी ‘रेशन बंद’ चा इशारा

Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

रेशनमधील कालबाह्य नियम बदलून नवीन नियम करावेत, यासह विविध मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघातर्फे जिह्यातील रेशन दुकानदारांच्यावतीने शुक्रवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान मागण्यांची पुर्तता न झाल्यास 1 जानेवारीपासून देशव्यापी ‘रेशन बंद’ करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Advertisement

महासंघाचे जनरल सेकेटरी कॉ. चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिह्यातील रेशन दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, रेशन दुकानदारांच्या मागण्या मान्य न झाल्यास 1 जानेवारीपासून रेशन बंद केले जाणार आहे. याबाबतचे केंद्र सरकार व राज्य सरकारला पाठवावयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना सादर करण्यात आले.

निवेदनातील मागण्या अशा, स्मार्ट पीडीएसद्वारे वितरण केलेल्या धान्याचे मार्जिन त्वरीत मिळावे, टू-जी ऐवजी फोर-जी-ईपॉस मशिन मिळावे, रेशनमधील कालबाह्य प्रचलित नियम बदलून त्वरीत नवीन नियम करावेत, 150 ऊपयांच्या मार्जिन मनीमध्ये वाढ कऊन किमान 300 ऊपये मार्जिन मनी मिळावे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम-2013 लाभार्थ्यांचे पात्रता निष्कर्ष त्वरीत बदलावेत, मराठवाडा, विदर्भातील आत्महत्याग्रस्त 14 जिह्यातील ए.पी.एल. शेतकरी लाभार्थ्यांना त्वरीत धान्य द्यावे, ‘आनंदाचा शिधा’ योजना कायमस्वऊपी राबवून यामध्ये पामतेलाऐवजी सोयाबीन, सुर्यफूल तेल देण्यात यावे, भारतीय राष्ट्रीय उपभोक्त सहकारी संघ (नाफेड) मार्फत कांदा, तुरडाळ, चणाडाळ, मुगडाळ अशा जीवनोपयोगी वस्तू रेशन दुकानात उपलब्ध कऊन देण्यात याव्यात.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, अशोक सोलापुरे, राजेश मंडलिक, गजानन हवालदार, दिनकर पाटील, अन्वर मोमीन, संदीप लाटकर, आबू बारगीर, महादेव कदम, महेश निल्ले, निंगाप्पा पाटील, संजय येसादे, दीपक चौगले, प्रवीणसिंह सावंत, संजय देसाई, आनंदा लादे, पांडु सुभेदार, दीपक शिराळे, अऊण शिंदे आदी सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :

.