For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीओपी मूर्तींवर निर्बंधासाठी आतापासूनच हालचाली

07:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
पीओपी मूर्तींवर निर्बंधासाठी आतापासूनच हालचाली
Advertisement

मूर्तिकार, फटाके विक्रेत्यांना नोटिसा : मंत्री ईश्वर खंडे यांची पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

बेंगळूर : निसर्ग आणि पर्यावरण संरक्षणासाठी वन, जीवशास्त्र व पर्यावरण मंत्री ईश्वर खंड्रे यांनी यावेळी गणेशोत्सवाच्या 7 महिने अगोदरच ठोस पावले उचलली आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती तयार करणारे आणि फटाके विक्रेत्यांना स्पष्ट सूचना देऊन नोटिसा बजावण्यात येणार आहे. यासंदर्भात मंत्री ईश्वर खंड्रे यांनी पर्यावरण खात्याच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत. जोपर्यंत पर्यावरण सुरक्षित आहे, तोपर्यंत आपण तग धरू शकतो. या उद्देशाने  जलस्रोत प्रदूषित करणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींची निर्मिती, त्यांची वाहतूक आणि विक्रीवर बंदी आहे, असे सांगून ईश्वर खंडे यांनी मूर्तीकारांना या संदर्भात योग्य माहितीसह उत्सवाच्या 7 महिने आधी नोटीस द्यावी, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे मूर्तीकारांकडून सरकारच्या या भूमिकेवर कोणती प्रतिक्रिया व्यक्त होईल, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. पाण्यात विसर्जित केल्या जाणाऱ्या रासायनिक रंगाच्या पीओपी मूर्ती बनविणारे प्रत्येक वेळी आपल्याला आधीच पूर्वसूचना दिली असती, मूर्ती तयार केल्या नसत्या,. आता तयार केलेल्या मूर्तींचे काय करायचे, आमचे नुकसान होईल, असे सांगतात. त्यामुळे सर्व पीओपीपासून मूर्ती बनविणाऱ्यांना 7 महिने अगोदरच नोटीस बजावून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याच्या आणि रासायनिक रंगांचा वापर न करण्याच्या सूचना देण्यास सांगण्यात आले आहे.

फक्त हिरव्या फटाक्यांना परवानगी

Advertisement

अधिक प्रमाणात वायूप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषण करणारे पारंपारिक फटाके देखील पर्यावरणास हानीकारक आहेत. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. याकरिता मागील वर्षी फटाक्यांची दुकाने उघडण्यास परवानगीसाठी अर्ज केलेल्या विक्रेत्यांची यादी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मिळवावी. तसेच फटाके विक्रेत्यांना केवळ हिरव्या फटाक्यांचा (ग्रीन व्रॅकर्स) साठा, वाहतूक आणि विक्री करण्यासाठी नोटिसा बजावण्याचे आदेशही मंत्री ईश्वर खंडे यांनी पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले. 2024 या वर्षात दिवाळीच्या कालावधीत हिरवे फटाके वगळता इतर फटाक्यांची विक्री रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. फटाक्यांचे घाऊक विक्रेते व किरकोळ विक्रेत्यांना योग्य ती माहिती नोटिसीद्वारे देण्याच्या सूचना केल्या आहेत.

Advertisement
Tags :

.