For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमी पटसंख्येच्या सरकारी शाळा बंद करण्याचा घाट

07:27 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
कमी पटसंख्येच्या सरकारी शाळा बंद करण्याचा घाट
Advertisement

एआयडीएसओ बेळगावकडून तीव्र विरोध

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

राज्याचे शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी कोणतीही सरकारी शाळा बंद केली जाणार नाही, असे सांगतानाच कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मुलांना केपीएस शाळांमध्ये स्थलांतरीत केले जाईल, असे म्हटले आहे. यावरून हे सिद्ध झाले की, राज्य सरकार हजारो सरकारी शाळा बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे. याला एआयडीएसओकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील सरकारी शाळा कायमस्वरूपी बंद करण्याचा हा एक डाव आहे. गरीब, शेतकरी, मजूर आणि शोषित वर्गातील मुलांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे. प्रत्येक गावात सरकारी शाळा असणे हा घटनात्मक हक्क आहे. तरीदेखील सरकारकडून तो हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सरकारच्या या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. एआयडीएसओ बेळगावसह इतर संघटनांनीही याला आपला तीव्र विरोध दर्शविला आहे. सरकारने हा निर्णय मागे घेऊन सर्वसामान्यांचे सार्वजनिक शिक्षण सुरू ठेवावे, या मागणीसाठी संपूर्ण राज्यभरातील एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.