कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्रात 34 हजार कोटींचे 16 कंपन्यांसोबत सामंजस्य करार

01:06 PM Aug 30, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

उद्योगांना पोषक असं वातावरण निर्माण केल्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योजक गुंतवणूक करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत अशा 16 कंपन्यांनी राज्याच्या विविध भागांमध्ये 34 हजार 269 कोटी ऊपयांचे सामंजस्य करार केले. या गुंतवणूकीतून 33 हजार 683 रोजगाराच्या संधीही निर्माण होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.

Advertisement

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव राजेश कुमार, उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, एमआयडीसीचे सीईओ पी. वेलरासू, विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह करार करणाऱ्या कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने उद्योगांना पोषक वातावरण निर्मिती केली आहे. उद्योजक, गुंतवणूकदार यांच्याशी सातत्याने संवाद ठेवला, त्यांच्या अडी-अडचणींना तातडीनं सोडविण्यावर भर दिला. अशा सामूहिक प्रयत्नांचं फलित म्हणजेच आजचे हे सामंजस्य करार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या उद्दिष्टाशी सुसंगत अशी वाटचाल महाराष्ट्र करतोय. त्यामुळेच 2030 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन आणि 2047 पर्यंत 5 ट्रिलियन करण्याचे उद्दिष्ट महायुती सरकारनं ठेवले आहे. महाराष्ट्र औद्योगिक धोरण 2019 आणि आगामी औद्योगिक धोरण 2025 यांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत 540 अब्ज डॉलर्सची नवी गुंतवणूक व 5 दशलक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. स्टार्टअप इकोसिस्टममध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून 31,000 पेक्षा जास्त स्टार्टअप्स, 25प्लस युनिकॉर्न्स व एमएसएमई क्षेत्र राज्याच्या एकूण आर्थिक वृद्धीत मोठा वाटा उचलत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वर्धा बंदर, अटल सेतू, समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रकल्पांमुळं राज्याचं लॉजिस्टिक्स व कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होत आहे. त्यातून राज्याचा सर्वांगीण विकास होत असल्याचे गौरवोद्गार उदय सामंत यांनी यावेळी काढले. या करारांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व रोजगारनिर्मिती होणार असून महाराष्ट्र राज्य हे देश-विदेशातील गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण राहील, यासाठी सातत्याने प्रयत्न सुऊच राहतील, असेही सामंत यांनी सांगितले.

भागीदार कंपन्या : ग्राफाइट इंडिया लि, नेक्स्ट जनरेशन मॅन्युफॅक्चर्स प्रायव्हेट लि, यूरोबस भारत प्रायव्हेट लि, व्हर्चुओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लि, युनो मिंडा ऑटो इनोव्हेशन्स प्रायव्हेट लि, एनर्जी आय.जी. मोशन प्रायव्हेट लि,जनरल पॉलीफिल्म्स प्रायव्हेट लि, पीएस स्टील अँड पॉवर प्रायव्हेट लि, बीएसएल सोलर प्रायव्हेट लि, सुफलम मेटल्स प्रायव्हेट लि,सुफलम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लि, कीर्तीसागर मेटलॉइज प्रायव्हेट लि, गोदरेज अँड बॉईस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि, सिरम ग्रुप (सिरम इन्स्टिट्यूट आणि रायझिंग सन), आर्सेलर मित्तल जीसीसी प्रायव्हेट लि, अंबुजा सिमेंट

या 16 कंपन्यांपैकी सर्वाधिक गुंतवणूक ही जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील मे. सिरम ग्रुप ऑफ कंपनीज यांच्याकडून पुणे इथे सुमारे 5 हजार कोटी ऊपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यातून सुमारे 3 हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article