Jyotiba | दख्खनच्या राजाच्या दरबारी गिर्यारोहकांची मानवंदना; जोतिबा मंदिराच्या उत्तर दरवाजाची विशेष स्वच्छता
जोतिबा मंदिर उत्तर दरवाजाची गिर्यारोहकांकडून स्वच्छता मोहीम
कोल्हापूर -दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील गिर्यारोहक संघटनांनी एकत्र येत जोतिबा मंदिराच्या उत्तर दरवाजाची स्वच्छता मोहीम रविवारी राबवली. चार तास ही विशेष स्वच्छता मोहीम सुरू होती. यामागे ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे, हा उद्देश होता.
कोल्हापुरातील सहज सेवा ट्रस्टच्या सहकार्याने आणि शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच, समिट अॅडव्हेन्चर, लाईव्ह अॅडव्हेन्चर, हिल रायडर्स फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जोतिबा डोंगरावर सकाळी ८ वाजता ही स्वच्छता मोहीम सुरू झाली. उत्तर दरवाजा कमानीच्या चारही बाजूंना काटेरी झुडपे बाढली होती. ही कमान उंच आणि दुर्गम भागात असल्याने, तेथे पोहोचणे कठीण होते. तरी हिल रायडर्स, समिट आणि लाईव्ह अॅ डव्हेन्चरच्या अनुभवी गिर्यारोहकांनी दोरखंडाच्या आणि गिर्यारोहण तंत्राचा वापर करून उंचावरील झुडपे मुळासकट काढून टाकली आणि संपूर्ण कमान स्वच्छ केली.
शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कमानीवरील गवत आणि इतर कचरा उचलूनपरिसराची स्वच्छता केली. शंभूराजे मंचचे मार्गदर्शक स्व. सूरज ढोली यांनी सुरू केलेली ही सेवाभावी परंपरा त्यांच्या शिष्यांनी तितक्याच निष्ठेने पुढे सुरू ठेवली आहे. या मोहिमेला जिल्हा प्रशासन, बाडी रत्नागिरी ग्रामपंचायत आणि प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे सहकार्य लाभले. जोतिबा मंदिराची उत्तर कमान ऐतिहासिक बास्तू आहे.
स्वच्छता करताना कार्यकर्ते, या वास्तूच्या दगडांच्या फटीत बाढणारी झाडे वास्तूला कमकुवत करतात. या मोहिमेमुळे परिसर स्वच्छ झाला. या मोहिमेत शिवभक्त आणि सेवाभावी नागरीक सहभागी झाले होते. जोतिबा मंदिर उत्तर कमानीच्या या संस्थांकडून होणाऱ्या स्वच्छतेचे हे २५ वे वर्ष आहे. उत्तर दरवाजाची स्वच्छता केल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.