‘है जवानी तो इश्क होना है’मध्ये मौनी रॉय
बेबी जॉननंतर वरुण धवन स्वत:च्या आगामी चित्रपटांसाठी मेहनत करत आहे. अभिनेत्याच्या खात्यात अनेक चित्रपट असून यातील काही हिट चित्रपटांचे सीक्वेल आहेत. याचबरोबर तो स्वत:चे पिता डेव्हिड धवनसोबत एक चित्रपट करणार असून याचे नाव ‘है जवानी तो इश्क होना है’ आहे. या चित्रपटात वरुण धवन मुख्य भूमिकेत असून याची निर्मिती रमेश तौरानी करणार आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून डेव्हिड धवन पुन्हा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात परतणार आहेत. वरुण धवनच्या या चित्रपटात मौनी रॉयची एंट्री झाली आहे. 39 वर्षीय मौनी चित्रपटात ग्लॅमरची पातळी वाढविणार आहे. वरुणच्या या चित्रपटात यापूर्वीच मृणाल ठाकूरची मुख्य नायिका म्हणून निवड झाली आहे.
आता मौनीची यात एंट्री झाल्याने प्रेक्षकांना वरुणसोबत दोन अभिनेत्रींचा रोमान्स पाहता येणार आहे. वरुण आगामी काळात भेडिया 2, मुझसे शादी करोगी 2, बॉर्डर 2, सनी संस्कारी की तुलसी कुमारी, नो एंट्री 2 या चित्रपटांमध्येही दिसून येणार आहे. तर मौनी रॉय अलिकडेच भूतनी या चित्रपटात दिसून आली आहे. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे.