For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मौनी रॉयने घेतला घटस्फोट

06:22 AM May 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
मौनी रॉयने घेतला घटस्फोट
Advertisement

सुरज नांबियारपासून झाली विभक्त

Advertisement

अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांचा घटस्फोट झाला आहे. मौनी रॉय आणि सूरजने परस्परांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याने त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली होती. अखेर दोघांनी याची सोशल मीडियावर घोषणा केली आहे.

मौनी ही इन्स्टाग्रामवर अत्यंत सक्रीय असते आणि पती सूरजसोबतच्या व्हेकेशनची छायाचित्रे शेअर करायची. परंतु आता मौनी किंवा सूरज पैकी कुणीच इन्स्टाग्रामवर परस्परांसोबतची छायाचित्रे किंवा व्हिडिओ शेअर करत नसल्याचे निदर्शनास आले होते. सूरजने तर मौनीसोबतच्या विवाहाची छायाचित्रे देखील डिलिट केली होती.

Advertisement

मौनी आणि सूरजने 2022 मध्ये विवाह केला होता. मल्याळी आणि बंगाली पद्धतीने दोघांनी विवाहाचे विधी पार पाडले होते. तेव्हा मौनी आणि सूरजने सोशल मीडियावर स्वत:च्या विवाहाची छायाचित्रे शेअर केली होती. परंतु आता ही छायाचित्रे सोशल मीडिया अकौंट्सवर नाहीत. सूरज हा दुबईत राहणारा इन्वेस्टमेंट बँकर आहे. 2019 साली सूरज आणि मौनी पहिल्यांदा भेटले होते आणि त्यानंतर परस्परांच्या प्रेमात पडले होते. सूरज आणि मौनीने स्वत:च्या रिलेशनशिपला दीर्घकाळापर्यंत गुप्त ठेवले होते.

Advertisement
Tags :

.