For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘अब होगा हिसाब’मध्ये मौनी

06:20 AM Jun 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘अब होगा हिसाब’मध्ये मौनी
Advertisement

शहीर शेख, संजय कपूर आणि मौनी रॉय यांची आगामी नवी वेबसीरिज ‘अब होगा हिसाब’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ही एक सूड अन् विश्वासघातावर आधारित ड्रामा कहाणी आहे.

Advertisement

अब होगा हिसाब सीरिज अमेझॉन एमएक्स प्लेयरवर पाहता येणार आहे. याचबरोबर ती प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, जियो टीव्ही आणि एअरटेल एक्स स्ट्रीमवर पाहता येऊ शकते. या सीरिजमध्ये अविनाश मिश्रा आणि निमृत कौर अहलूवालिया हे कलाकार दिसून येणार आहेत. तर या सीरिजमधून टीव्ही अभिनेता अविनाश मिश्रा स्वत:चे डिजिटल पदार्पण करत आहे.

या सीरिजमध्ये पंजाबमध्ये राहणारे दोन भाऊ बॉबी (शहीर शेख) आणि बंटी  (अविनाश मिश्रा) यांची कहाणी आहे. मोठा भाऊ बॉबी स्वत:चा छोटा भाऊ बंटीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मेहनत करत असतो आणि त्याला विदेशात पाठवू इच्छित असतो. बंटीची भेट गोल्डी (संजय कपूर) नावाच्या एका प्रभावशाली इसमासोबत भेट होते. यानंतर बंटी अचानक गायब होतो, तसेच आणखी काही लोक गायब झाल्याचे समोर येताच बॉबी स्वत:च्या भावाला शोधण्यासाठी धोकादायक मार्गावर जात असल्याची कहाणी आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.