For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोटोरोलाचा ‘रेझर फोल्ड स्मार्टफोन भारतीय बाजारात

06:35 AM May 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोटोरोलाचा ‘रेझर फोल्ड स्मार्टफोन भारतीय बाजारात
Advertisement

50 मेगापिक्सलचा कॅमेरा:  किंमत लाखावर

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दिग्गज टेक कंपनी मोटोरोला यांनी भारतीय बाजारात आपला सर्वात प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन, मोटोरोला रेझर फोल्ड सादर केला आहे. या स्मार्टफोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे त्याचा 8.1-इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले आणि नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 5 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचे तीन रियर कॅमेरे दिलेले आहेत. मोटोरोलाने रेझर फोल्ड दोन स्टोरेज व्हेरिएंट आणि एका स्पेशल एडिशनमध्ये लॉन्च केला आहे. याची किंमत 1.50 लाख पासून सुरू होते.

Advertisement

मोटोरोला रेझर फोल्डची मॉडेलनुसार अंदाजे किंमत

12जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज : 1,49,999

16जीबीसह रॅमसह 512जीबी स्टोरेज : 1,59,999

फिफा वर्ल्ड कप 2026 एडिशन

लाँच ऑफरमध्ये, 10,000 रुपयांचा इन्स्टंट बँक डिस्काउंट किंवा एक्सचेंज बोनस मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ग्राहकांसाठी 18 महिन्यांपर्यंत नो-कॉस्टइएमआयचा पर्याय देखील आहे. जे 20 जूनपर्यंत फोन खरेदी करतील त्यांना 1 वर्षासाठी ‘एकदा मोफत क्रीन रिप्लेसमेंट“ची सुविधा मिळेल. फोनची प्री-ऑर्डर सुरू झाली आहे.

मटेरियल आणि फील: फोन बनवण्यासाठी उच्च-दर्जाचे अॅल्युमिनियम आणि काच वापरली आहे. याचे वजन 243 ग्रॅम आहे. मागील पॅनलला एक प्रीमियम टेक्स्चर आहे, ज्यामुळे हातात चांगली पकड मिळते.

डिस्प्ले लेआउट: फ्रंट कव्हर डिस्प्लेला पातळ बेझल्स दिले आहेत. दुमडल्यावर ते बरेच कॉम्पॅक्ट होते.

बटन्स: यात तळाशी टाइप-सी चार्जिंग पोर्ट, सिम ट्रे आणि स्पीकर ग्रिल आहे. पॉवर बटणामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

स्पेसिफिकेशन्स: डिस्प्लेपासून परफॉर्मन्सपर्यंत सब ‘एक्सट्रीम“

  1. डिस्प्ले: दोन क्रीन्स आणि 120 एचझेड रिफ्रेश रेट
  2. कॅमेरा: ट्रिपल 50 मेगापिक्सेल सेटअप
  3. परफॉर्मन्स आणि सॉफ्टवेअर प्रोसेसर: यात जगातील सर्वात वेगवान स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसर आहे
  4. पॉवर बॅकअप: 6000एमएएच मोठी बॅटरी

चार्जिंग: यात80 डब्ल्यू वायर्ड आणि 50डब्ल्यू वायरलेस चार्जिंगची सोय आहे. कंपनीचा दावा आहे की, एका चार्जवर फोन 43 तासांपेक्षा जास्त बॅकअप देऊ शकतो.

Advertisement
Tags :

.