For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोटोरोलाचा सिग्नेचर 23 जानेवारीला होणार लाँच

06:42 AM Jan 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोटोरोलाचा सिग्नेचर  23 जानेवारीला होणार लाँच
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

मोटोरोला यांचा सिग्नेचर हा स्मार्टफोन आणि मोटोवॉच हे स्मार्टवॉच येत्या 23 जानेवारीला भारतात लॉन्च केले जाणार आहे. दोन्हीही स्मार्टफोन आणि स्मार्ट वॉच हे 7 जानेवारीला झालेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये सादर करण्यात आले होते.

लेनोवोच्या मालकीअंतर्गत असणारा मोटोरोलाचा सिग्नेचर हा स्मार्टफोन 23 जानेवारी रोजी अखेर लॉन्च केला जाणार आहे. 5200 एमएएचची बॅटरी याला असणार असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जन 5 यावर तो चालेल. 6.8 इंचाचा एलटीपीओ अमोलेड डिस्प्ले याला असणार असून 16 जीबी रॅम आणि एक टीबी पर्यंत स्टोरेज व्यवस्था यात असेल. ट्रिपल कॅमेरा सोबत येणारा हा स्मार्टफोन 50 मेगापिक्सलचा असेल. 90 डब्ल्यू आणि 50 डब्ल्यूचा अनुक्रमे वायर्ड आणि वायरलेस चार्जर देण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची विविध वैशिष्ट्यो या फोनमध्ये दिली गेलेली असल्याची माहिती आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.