For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोटोरोला एज-70 स्मार्टफोन लाँच

07:00 AM Dec 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
मोटोरोला एज 70 स्मार्टफोन लाँच
Advertisement

पेन्सिलपेक्षाही पातळ : 5.99 मिमी अल्ट्रा थिन डिझाइनसह 50 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा

Advertisement

नवी दिल्ली : टेक कंपनी मोटोरोलाने भारतात एक नवीन प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन मोटोरोला एज 70 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन भारतात अल्ट्रा-थिन डिझाइनसह लाँच करण्यात आला आहे. हा फक्त 5.99 मिमी पातळ आहे आणि त्याचे वजन 159 ग्रॅम आहे. हा नवीन स्मार्टफोन 5.64 मिमी पातळ आयफोन एअर आणि 5.8 मिमी पातळ गॅलेक्सी एस25 एजला टक्कर देणार आहे. त्याच वेळी, तो मिड-रेंजमध्ये 5.75 मिमी जाडीच्या टेक्नो स्पार्क स्लिमशी स्पर्धा करेल. हा फोन एअरक्राफ्ट-ग्रेड अॅल्युमिनियम फ्रेम, टेक्सचर्ड बॅक पॅनल आणि तीन पॅन्टोन-क्युरेटेड कलर पर्यायांसह येतो. त्यात लिली पॅड, गॅझेट ग्रे आणि ब्रॉन्झ ग्रीन समाविष्ट आहेत. याशिवाय, मोटोरोला एज 70 मध्ये 50 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. किंमत 29,999 8 जीबी रॅमसह हा फोन 8 जीबी रॅम 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये 29,999 रुपये किमतीत लाँच करण्यात आला आहे. त्याची विक्री 23 डिसेंबरपासून सुरू होईल. कंपनीने फोनची प्री-बुकिंग सुरू केली आहे.

मोटोरोला एज 70मध्ये काय? 

Advertisement

डिस्प्ले: मोटोरोला एज 70 मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 2712 स 1220 पिक्सेल आहे. पॉलएड पॅनलवर बनवलेला हा क्रीन 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर काम करतो आणि 4500 निट्सचा पीक ब्राइटनेस आहे.  क्रीनच्या सुरक्षिततेसाठी गोरिल्ला ग्लास 7आय प्रोटेक्शन देण्यात आले आहे.  कॅमेरा: फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50 एमपी प्रायमरी कॅमेरा आणि 50 एमपी अल्ट्रा-वाइड  मॅक्रो व्हिजन सेन्सरचा ड्युअल सेटअप आहे.

Advertisement
Tags :

.