For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोटोरोला एज 70 प्रो स्मार्टफोन लाँच

07:00 AM Apr 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोटोरोला एज 70 प्रो स्मार्टफोन लाँच
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

टेक कंपनी मोटोरोलाने भारतात आपल्या प्रीमियम ‘एज सिरीज“मध्ये नवीन स्मार्टफोन मोटोरोला एज 70 प्रो लॉन्च केला आहे. या सिरीजमधील हे तिसरे मॉडेल आहे, यापूर्वी कंपनीने एज 70 आणि एज 70 फ्यूजन सादर केले होते. मोटोरोलाचा हा नवीन फोन भारतातील पहिला स्मार्टफोन आहे जो मीडियाटेकच्या नवीनतम डायमेन्शन 8500 एक्सट्रीम प्रोसेसरसह येतो. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि 6500 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. मोटोरोला एज 70 प्रो दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. याची सुरुवातीची किंमत 38,999 रुपये आहे. फोनची विक्री 29 एप्रिलपासून सुरू होणार आहे.  सदरचा फोन पेंटोन टी, पेंटोन लिली व्हाईट आणि पेंटोन टायटन या रंगांमध्ये उपलब्ध असेल.

डिझाइन आणि बिल्ड क्वालिटी : मिलिटरी ग्रेडची मजबुती आणि स्लिम बॉडी मोटोरोलाने या फोनच्या डिझाइन व मजबुतीवर खूप मेहनत घेतली आहे. मटेरियल आणि टिकाऊपणा: हा फोन एमआयएल एसटीडी 810 एच  मिलिटरी ग्रेड प्रमाणित आहे, म्हणजेच तो पडणे आणि धक्के सहन करण्यास सक्षम आहे. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी त्यावर कॉर्निंग गोरिला ग्लास 7 आयचे संरक्षण आहे.

Advertisement

डिस्प्ले : समोरच्या बाजूला अतिशय पातळ बेझल्स असलेली 6.8-इंचाची कर्व्हड क्रीन आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी वरच्या मध्यभागी एक पंच-होल कटआउट देण्यात आला आहे.

परफॉर्मन्स : देशातील पहिला डायमेन्शन 8500 एक्सट्रीम प्रोसेसर. मोटोरोला एज 70 प्रो हा मीडियाटेक डायमेन्शन 8500 एक्सट्रीम चिपसेटवर चालणारा पहिला फोन आहे. कनेक्टिव्हिटी आणि इतर वैशिष्ट्यो: हा फोन वायफाय 6ई आणि ब्लूटूथ 5.4  ला सपोर्ट करतो. ऑडिओसाठी स्टिरिओ स्पीकर्स दिले आहेत. कंपनीने 3 वर्षांचे ओएस अपग्रेड्स आणि 5 वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सचे आश्वासनही दिले आहे.

Advertisement
Tags :

.