For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मोटोरोला एज 50’ स्मार्टफोन बाजारात दाखल

07:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘मोटोरोला एज 50’ स्मार्टफोन बाजारात दाखल
Advertisement

सुरुवातीची किंमत 25,999 रुपये

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

स्मार्टफोन निर्मितीमधील मोटोरोलाने भारतीय बाजारपेठेत ‘मोटोरोला एज50’ हा स्मार्टफोन दाखल केला आहे. सदरचा स्मार्टफोन हा जगातील सर्वात पातळ फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ‘मोटो एआय’ ने सुसज्ज असलेला 50 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा राहणार आहे. यासोबतच 6.67 इंचाचा पोलेड वक्र डिस्प्ले व 68 डब्ल्यू चार्जिंग सपोर्ट असलेली 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार असल्याचेही म्हटले आहे. कंपनीने हा स्मार्टफोन सिंगल स्टोरेज व तीन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध करुन दिला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत ही 25,999 रुपये राहणार असून 8 ऑगस्ट 2024 पासून हा फोन खरेदीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

Advertisement

फिचर्स :

डिस्प्ले : मोटोरोला एज50 मध्ये 144 एचझेड रिप्रेश रेटसह 6.67 इंचाचा डिस्प्ले,कॅमेरा : फोटोग्राफीसाठी, स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 50 एमपी सोनी एलवायटीआयए 700 सी प्राथमिक व 13 एमपी दुय्यम कॅमेरा राहणार  स्मार्टफोनमध्ये अँड्राईड 14 वर चालणारा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे.

Advertisement
Tags :

.