कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोलिसांच्या सतर्कतेने मोटार सायकल जप्त

05:58 PM Jun 06, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कराड :

Advertisement

वाहतूक तपासणीदरम्यान पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे कराडमध्ये चोरीस गेलेली एक मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. कॉटेज हॉस्पिटलसमोरील चौकात नियमित तपासणी दरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन युवकांना थांबवून चौकशी केली असता, त्यांच्याकडील दुचाकी ही कोल्हापूर येथून चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाले. दोघांनाही ताब्यात घेऊन शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Advertisement

बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास, कॉटेज हॉस्पिटल समोरील चौकात वाहतूक नियंत्रणाच्या कामावर नियुक्त असलेले पोलीस - नाईक एन. बी. पाटील आणि ए. डी. मुळे हे कर्तव्यावर होते. यावेळी एका दुचाकीवर दोघेजण येताना दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने थांबवून चौकशी केली.

वाहन चालवणाऱ्या युवकाने आपले नाव अनिल हणमंतराव आखलवाडी (वय १९, रा. हणमंतराया लवंगी, जि. विजापूर) असे सांगितले. त्याच्या मागे बसलेल्या युवकाने आपले नाव सद्दाम शब्दीन शेख (रा. गांधीनगर, जि. कोल्हापूर) असे सांगितले. त्यांच्यावरील संशय बळावताच सहाय्यक पोलीस निरडक्षक संदीप सलर्यवंशी तिथे दाखल झाले. सूर्यवंशी यांनी तपासणी केल्यावर दुचाकीवर एमएच-५१-१५९७ असा क्रमांक दिसून आला. गाडी कोल्हापूर जिल्ह्याची असल्यामुळे पोलिसांनी तिची कागदपत्रे विचारली असता चालक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी नाकाबंदी अॅपद्वारे वाहनाच्या क्रमांकाची पडताळणी केली असता, सदर मोटारसायकल कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरी झालेली असल्याचे निदर्शनास आले.

ही माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस नाईक के. ए. टिकोळे, एम. बी. सावंत, एन. बी. पाटील आणि ए. डी. मुळे यांनी चौकशी सुरू केली. तोपर्यंत संदीप सूर्यवंशी यांनी मोटारसायकलसह दोन्ही युवकांना ताब्यात घेतले आणि वाहतूक शाखेच्या आवारात आणले. दुचाकीची पडताळणी केली असता संबंधित फिर्याद प्राप्त झाली व ती गाडी चोरीची असल्याची खात्री झाली. त्यानुसार दोघा युवकांना शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article