For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रेनने घेतला पायलटचा बळी

01:11 PM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
क्रेनने घेतला पायलटचा बळी
Advertisement

फोंडा बसस्थानकाजवळील घटना : नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त,सुपरिचित पायलट गोल्याने हळहळ,महामार्ग ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न

Advertisement

फोंडा : बेदरकार क्रेनने फोंडा येथे एका मोटारसायकल पायलटचा हकनाक बळी घेतला. येथील कदंब बसस्थानकावर काल मंगळवार दि. 11 रोजी सकाळी 9.30 वा. सुमारास हा अपघात घडला. प्रकाश दत्ताराम चोडणकर (58, रा. कवळे, फोंडा) असे मृत पायलटचे नाव आहे. क्रेन चालकाच्या बेजबादारपणामुळे एका निष्पाप व्यक्तीला प्राण गमवावे लागल्याने, या घटनेबद्दल फोंड्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शापूर-फोंडा येथील कदंब बसस्थानकाला लागूनच सध्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुऊ आहे. त्यासाठी काही क्रेन्स व अवजड यंत्राचा वापर केला जात आहे. त्यापैकी एनएल 02 क्यू 1881 या क्रमांकाची यादव क्रेन सर्विसची ही क्रेन कदंब बसस्थानकाचा वळसा घेऊन भरधाव वेगात आली. यावेळी प्रकाश चोडणकर हे आपल्या जीए 05 टी 4166 या मोटारसायकलवर बसून वर्तमानपत्र वाचित होते.

क्रेनने घेतला निष्पाप बळी

Advertisement

बेदरकार क्रेनने वर्तमानपत्र वाचत असलेल्या प्रकाश यांच्या दुचाकीला समोऊन धडक देत साधारण दहा मीटरपर्यंत ओढीत नेले. त्यात प्रकाश यांचा जागीच मृत्यू झाला. बसस्थानकावर उभ्या असलेल्या एका प्रवासी मिनीबसलाही क्रेनची निसटती धडक लागल्याचे घटनास्थळावरील काही प्रत्यदर्शींनी सांगितले. अपघातानंतर क्रेनचालकाने घटनास्थळावऊन पळून जाण्याच्या प्रयत्न केला. यावेळी तेथील काही प्रवाशांनी त्याला पकडून नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.

मोटरसायकलद्वारे उदरनिर्वाह

मयत प्रकाश चोडणकर हे मूळ कवठणी, सावंतवाडी महाराष्ट्र येथील असून कामानिमित्त कुटुंबासह साधारण पंचवीस वर्षांपासून फोंड्यात वास्तव्य कऊन होते. सुऊवातीला उसगाव येथील एमआरएफ कंपनीमध्ये ते कामाला होते. त्यावेळी कंपनीत झालेल्या संपामुळे ज्या काही कामगारांना कामावऊन कमी करण्यात आले, त्यात प्रकाश हेही होते. पत्नी व पदरी दोन मुले असल्याने त्यांनी कुटुबांच्या उदरनिर्वाहासाठी फोंड्यातच मोटारसायकल पायलट व्यावसाय सुऊ केला. येथील कदंब बसस्थानकावरील स्टँडवर ते थांबत. सुऊवातीला दुर्गाभाट-फोंडा, नंतर पाऊणवाडा कवळे, दुर्भाट अशा विविध ठिकाणी बिऱ्हाडे बदलीत सध्या ते कवळे येथे भाड्याच्या खोलीत राहत होते.

वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी काळाचा घाला

प्रकाश हे मोटारसायकल पायलट म्हणून फोंड्यात सर्वपरिचित होते. अत्यंत कष्टमय परिस्थितीत त्यांनी भाड्याच्या खोलीत राहून मुलांना चांगले शिक्षण दिले. त्यांच्या मोठ्या मुलीने शिक्षण पूर्ण कऊन मडगाव येथील आयटी कंपनीत, तर धाकटा मुलगा पणजी येथे सीएकडे नोकरी करतो. दोन्ही मुले नुकतीच कुठे कामाला लागल्याने त्यांचे कुटुंब स्थिरस्थावर झाले होते. घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी प्रकाश यांनी कुटुंबासोबत आपला वाढदिवसही मोठ्या आनंदात साजरा केला होता. त्याच्या मित्रपरिवाराकडून व्हॉट्सअॅप व फेसबुकवऊन त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला. मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक ग्राहक  व मित्रही जोडले होते. त्यांच्याकडूनही हळहळ व्यक्त करण्यात आली. पावसाला सुऊवात झाल्याने व अशा काळात ग्राहकही फारसे मिळत नसल्याने गेल्या पाचसहा दिवसांपासून ते स्टँडवर आले नव्हते. नेमके मंगळवारी सकाळी ते कदंब बसस्थानकावरील स्टँडवर येऊन ग्राहकांच्या प्रतिक्षेत थांबले व हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला.

ज्या महामार्गाच्या कामावरील क्रेनमुळे प्रकाश यांचा बळी गेला, त्याठिकाणी  सुपरव्हायझर किंवा सुरक्षेच्या कोणत्याच उपयोजना नाहीत. कदंब बसस्थानकाला लागूनच हे काम सुऊ आहे. तेथे प्रवाशांची नेहमीच वर्दळ व वाहनांची मोठ्याप्रमाणात ये जा सुऊ असते. अशा परिस्थितीत कंत्राटदाराकडून सुरक्षेची कुठलीच खबरदारी घेतली जात नाही. या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली, असा आरोप करीत घटनास्थळी जमलेल्या काही लोकांनी काहीवेळ काम बंद पाडले. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा कऊन क्रेनखाली चिरडला गेलेला छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथील हॉस्पिसियोमध्ये पाठविला. या अपघाताची सखोल चौकशी होऊन मयत प्रकाश यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी सायंकाळी उशिरायर्पंत फोंडा पोलिसांत नातेवाईक व हितचिंतकांनी ठाण मांडली होती. निष्काळजीपणे वाहन हाकून एकाचा बळी घेतल्याबद्दल क्रेनचालक रंजीत नागेंद्र कुमार (रा. बिहार) या क्रेनचालकाविऊद्ध फोंडा पोलिसांत गुन्हा नोंदविला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.